शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा धोका वाढला, जिल्ह्यात आणखी 11 रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2022 05:00 IST

जिल्ह्यातील कोरोना रुग्ण घटल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आले आहे. त्यातच शाळा-महाविद्यालये सुरळीत सुरू होत असतानाच पुन्हा कोरोना रुग्ण वाढू लागल्याने चिंता वर्तविली जात आहे. गुरुवारी जिल्ह्यात नऊ कोरोना रुग्ण निष्पन्न झाले होते. शुक्रवारी त्यात आणखी ११ नव्या रुग्णांची भर पडली. शुक्रवारी बाधित निघालेल्या रुग्णांमध्ये यवतमाळ येथील चार रुग्णांसह दारव्हा तालुक्यातील दोन, दिग्रस तालुक्यातील तीन, तर नेर व राळेगाव तालुक्यातील प्रत्येक एका रुग्णाचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. मात्र, मागील काही दिवसांत पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. गुरुवारी जिल्ह्यात नऊ नव्या रुग्णांची नोंद झाल्यानंतर शुक्रवारी त्यात आणखी ११ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढत आहे. नागरिकांनी त्रिसूत्री नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण घटल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आले आहे. त्यातच शाळा-महाविद्यालये सुरळीत सुरू होत असतानाच पुन्हा कोरोना रुग्ण वाढू लागल्याने चिंता वर्तविली जात आहे. गुरुवारी जिल्ह्यात नऊ कोरोना रुग्ण निष्पन्न झाले होते. शुक्रवारी त्यात आणखी ११ नव्या रुग्णांची भर पडली. शुक्रवारी बाधित निघालेल्या रुग्णांमध्ये यवतमाळ येथील चार रुग्णांसह दारव्हा तालुक्यातील दोन, दिग्रस तालुक्यातील तीन, तर नेर व राळेगाव तालुक्यातील प्रत्येक एका रुग्णाचा समावेश आहे. या ११ रुग्णांमध्ये चार महिला असून सात पुरुषांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी कोरोना त्रिसूत्री नियमांचे पालन करण्याची गरज आहे. कोरोनाचा पहिला, दुसरा व तिसरा डोस घेऊन पूर्ण लसीकरण करावे, स्वत:सह कुटुंबीयांना सुरक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. 

पॉझिटिव्हिटी दर ९ वर - शुक्रवारी नव्या ११ रुग्णांची नोंद झाली. त्यापूर्वी गुरुवारी नऊ बाधित आढळले होते. या नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या २७ एवढी झाली आहे. यातील तीन रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. दरम्यान जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ९ इतका झाला असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर २.५६ आहे, तर मृत्यू दर २.२८ इतका आहे.

आजवर १८०३ जणांचा मृत्यू- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, यासाठी यवतमाळकरांनी विशेष दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आजवर जिल्ह्यात कोरोनामुळे तब्बल १८०३ मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेल्यानंतर गंभीर रुग्णांचे प्रमाणही वाढते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी सर्वांनाच दक्षता बाळगावी लागणार आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या