शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प अधिकाऱ्याला घातला चक्क नोटाचा हार, वंचितचे निषेध आंदाेलन

By सुरेंद्र राऊत | Updated: March 4, 2024 18:08 IST

अधिकाऱ्यांना वारंवार निवेदनं देऊन सुद्धा नियमित तपासणी न करता कंत्राटदाराला संरक्षण देण्याचे काम केले जात हाेते.

यवतमाळ :  शहरात बार्टी द्वारा संचालित बँकिंग, रेल्वे, एल.आय.सी. लिपिकाच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षण वर्गात मूलभूत सुविधाचा अभाव आहे. येथे  अनुभवी आणि तज्ञ मार्गदर्शकाचा नाही, संगणकाची व्यवस्था नसून  विद्यावेतन दिले जात नाही. या मुद्दावर वंचीत बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेत थेट समाज कल्याण विभागातील प्रकल्प अधिकाऱ्याच्या गळ्यात नाेटांचा हार घालून साेमवारी निषेध आंदाेलन केले. त्यानंतर समाजक कल्याण अधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध नाेंदविला. 

अधिकाऱ्यांना वारंवार निवेदनं देऊन सुद्धा नियमित तपासणी न करता कंत्राटदाराला संरक्षण देण्याचे काम केले जात हाेते. या गैरकारभारा विराेधात  वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी समाज कल्याण अधिकारी यांच्या कार्यालयावर धडक देऊन संबंधित यंत्रणेला जाब विचारला. तसेच सक्षम अधिकारी गैरहजर असल्यामुळे त्यांच्या अकार्यक्षमतेचा निषेध म्हणून त्यांच्या रिकाम्या खुर्चीला शाल आणि पुष्षहार अर्पण करून तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच देखरेख आणि सनियंत्रण करणाऱ्या प्रकल्प अधिकाऱ्याला त्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीच्या विरोधात  पदाधिकाकऱ्यांनी नोटांचा हार घालून निषेध नाेंदविला. 

अनुसूचित जातीचे शेकडो विद्यार्थी बार्टीमार्फत बँकेच्या परीक्षेची पूर्वतयारी करीत आहेत. सदर प्रशिक्षण हे मैत्रेय करिअर अकॅडमी या खाजगी कंत्राटदाराकडे देण्यात आले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना संगणकासह इतर मुलभूत सुविधांचा पुरवठाच केला नसल्याने विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय हाेत आहे. त्यामुळे त्यांचा सहा महिन्याचा कालावधी  व्यर्थ गेला आहे.  यांच्या निषेधार्थ डॉ निरज वाघमारे यांच्या नेतृत्वात आंदाेलन करण्यात आले. याप्रसंगी  शिवदास कांबळे, धम्मवती वासनिक, आकाश वाणी, कुंदन नगराळे,  पुष्पा सिरसाठ यांच्यासह प्रशिक्षणार्थी  रवी गोडघाटे, अमर भगत आयुष दिवे, गौरव चावरे, सिद्धांत नगराळे, आशिष बिहाडे, सुरज टिपकर प्रतीक तायडे, रविना बनसोड, आचल सहारे,क्षमा ढोके,साक्षी मिसळे, प्रणाली मुनेश्वर, नम्रता फुलमाळी, राजश्री लंबे,ओजस्विता चहांदे,, अंकिता कांबळे, भूमिका मिसळे,ऐश्वर्या दुर्योधन, अभय कळसकर,हर्षदीप बांगर, गुंजन धवणे, अर्पिता जवादे, आकाश भगत, अश्विनी साळोडे,अंकुश सालोडे, ऋषीकेष माहुरे,आदित्य कांबळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ