शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

घरात ठेवलेला कापूस शेतकऱ्यांना चावू लागला; अंगाला सुटली खाज: डस्ट माइट्सचे आक्रमण

By रूपेश उत्तरवार | Updated: April 14, 2023 08:39 IST

कापसाला दर नसल्याने  चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांची आणखी एक चिंता वाढली असून साठवून ठेवलेल्या कापसामुळे शेतकऱ्यांच्या अंगाला खाज सुटू लागली आहे.

यवतमाळ :

कापसाला दर नसल्याने  चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांची आणखी एक चिंता वाढली असून साठवून ठेवलेल्या कापसामुळे शेतकऱ्यांच्या अंगाला खाज सुटू लागली आहे. जणू कापूस शेतकऱ्याला चावू लागला आहे. एकाच जागी साठवून राहिलेल्या कापसावर डस्ट माइट्स किडीचे आक्रमण झाले आहे. अशा साठविलेल्या कापसाच्या सान्निध्यात येणाऱ्या व्यक्तीच्या अंगाला खाज सुटत आहे. 

 गतवर्षी कापसाला १२ हजार रुपये क्विंटलचा दर होता. यावर्षी किमान १० हजार रुपये क्विंटल दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. प्रत्यक्षात सात महिन्यांचा कालावधी लोटला तरी कापसाला चांगला दर मिळाला नाही. यामुळे शेतकऱ्यांना एप्रिल मध्यापर्यंत कापूस विकता आला नाही. आता या कापसाने शेतकरी कुटुंबात खाजेचा आजार पसरला आहे. यात अंगावर बारीक पुरळ येत आहेत. असह्य वेदनाही होतात. रुग्णालयात अशा रुग्णांची संख्या ग्रामीण भागात वाढलेली आहे.

डस्ट माइट्स म्हणजे काय?ही एक काेळीवर्गीय जातीची कीड आहे. धुळीच्या कणाइतकी बारीक याची प्रजाती आहे. ती पटकन दृष्टीस पडत नाही. कापूस आणि डस्टवर ही कीड मोठी होते. यातून हातावर, पायावर, प्रथम लाल बारीक पुरळ येतात. 

कापूस साठविलेल्या घरामध्ये किंवा गोदामात धूळ जमा होते. या धुळीवर कोळी ही कीड वाढते. साठवणुकीचा काळ जितका जास्त तितकी डस्ट जास्त होते. त्यावर माइट्सची पैदास वाढते.- डॉ. प्रमोद मगर, कीटक शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळखाजीने पुरळ येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. खासकरून ज्यांच्या घरी कापूस साठवला आहे अशाच कुटुंबात हा आजार पसरला आहे. यावर ॲन्टिॲलर्जिक औषधांचा उपचार केला जात आहे. या आजारात पाच ते सात दिवसांच्या उपचारांनंतरच रुग्ण बरे होत आहेत.- डॉ. अनिल नाईक, बोरीअरब, यवतमाळ