शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सबसिडी बंद झाल्याने सर्वसामान्यांना गॅस परवडेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 17:22 IST

सरपण गोळा करण्याची लगबग, योजनेचा बोजवारा : ८५० रूपये आता घरगुती गॅसची किंमत झाली

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : घरगुती गॅस सिलिंडरची सतत दरवाढ होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनता महागाईने त्रस्त झाली आहे. गॅस सिलिंडरचे वाढते दर सर्वसामान्यांना पेलवत नसल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनी पुन्हा एकदा शेत, जंगलाची वाट धरली आहे. महिलांना उन्हातान्हात शेतात वणवण करत जळणासाठी सरपण मिळविण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत असल्याने गोरगरिबांची पंचाईत झाली. त्याचबरोबर गॅसची सबसिडी बंद झाल्यामुळे ग्रामीण भागातील महिला चुलीकडे वळत आहेत.

घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८५० रुपयांवर पोहोचली असून त्यात अतिरिक्त गाडीभाडे द्यावे लागत आहे. ग्रामीण भागातील हातावर पोट असणाऱ्या ग्रुप सर्वसामान्य गरिबांना, कष्टकरी महिलांना या सिलिंडर परवडत नसल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून पुन्हा चुलीकडे वळलेले दिसून येत आहे. पुन्हा सरपणाचा शोध, उसाची खोडवी, शेणाच्या गोवऱ्या, झाडांच्या वाळलेल्या फांद्या तोडून त्या रचून ठेवण्यामध्ये महिलावर्ग मग्न आहेत. 

किमती आवाक्याबाहेर१०० रुपयांत उज्ज्वला गॅसची जोडणी मिळत असल्याने सुरुवातीच्या काळात या योजनेला उत्तम प्रतिसादही मिळाला; परंतु सिलिंडरच्या किमती दरवाढ आवाक्याबाहेर गेल्याने आपली चूलच बरी अशी भावना गरीब कुटुंबांतील महिलांची झाली आहे.

पैसे नसल्याने सिलिंडर घ्यायचे तरी कसे ?

  • उज्ज्वला योजनेतून गॅस सिलिंडर आणि शेगडी सरकारकडून मिळाली, परंतु ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना एकदा संपलेले सिलिंडर पुन्हा घेण्यासाठी पैसेच नसल्याने त्यांना ते रिफिल करता येत नाही.
  • त्यातही सबसिडी बंद झाली आहे. त्यामुळे योजनेचा मूळ उद्देश बाजूला पडला आहे. गॅस सिलिंडर घेणे परवडत नसल्याने ग्रामीण भागातील जनता पुन्हा चुलींचा आधार घेत आहे.
  • सरपणासाठी महिला जंगलात भटकंती करत असल्याचे चित्र विशेषतः वाडी तांड्यावरील दुर्गम खेड्यापाड्यात पाहायला मिळत आहे.
टॅग्स :YavatmalयवतमाळCylinderगॅस सिलेंडर