शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीसाठी संतापलेल्या गावकऱ्यांनी केला रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 05:00 IST

सुनंदा सखाराम राठोड (६१) या महिलेचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कुठे करायचे, हा प्रश्न उभा ठाकला. गावकरी व नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी जमले होते. वारंवार विनंती करूनही प्रशासन ऐकत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यवतमाळ- पांढरकवडा मार्गावर मृतदेह घेऊन आंदोलन करण्यात आले. नेहमीच जागा मिळेल तेथे अंत्यसंस्कार करून त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कमोहदा : कळंब तालुक्यातील किन्हाळा येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी हक्काची स्माशनभूमी नाही. ज्यांच्याकडे स्वत:ची शेतजमीन आहे, ते स्वत:च्या शेतात अंत्यसंस्कार करतात. भूमिहीनांना मात्र अडचण निर्माण होते. स्मशानभूमी तयार केली जावी, अशी मागणी वारंवार लावून धरण्यात आली. याची दखल प्रशासनाने घेतली नाही. रविवारी गावातील महिलेच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला. यासाठी ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. पांढरकवडा महामार्ग रोखून धरला. सुनंदा सखाराम राठोड (६१) या महिलेचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कुठे करायचे, हा प्रश्न उभा ठाकला. गावकरी व नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी जमले होते. वारंवार विनंती करूनही प्रशासन ऐकत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यवतमाळ- पांढरकवडा मार्गावर मृतदेह घेऊन आंदोलन करण्यात आले. नेहमीच जागा मिळेल तेथे अंत्यसंस्कार करून त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. सकाळी १० वाजेपासून महामार्गावर लाकडी ओंडके, टायर जाळून रस्ता वाहतूक बंद केली. आंदोलनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले, पोलीस उपनिरीक्षक भास्कर दरणे, उपनिरीक्षक सिडाम,  बीट जमादार शेखदार, जंगले, बोकडे, ग्रामसेवक सोनपराते, तलाठी डोळस घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांच्या प्रश्नांचे उत्तर या कर्मचाऱ्यांकडे नव्हते. गावात ८० आर जमीन आहे. तेथे स्मशानभूमी केली जाऊ शकते हा प्रस्तावही अनेकदा देण्यात आला. मात्र,  या प्रस्तावाचा फायलीतील प्रवास काही केल्या संपला नसल्याचा आरोप करीत रोष व्यक्त केला. 

अन्‌ अधिकारी झाले निरुत्तर- यामुळे अधिकाऱ्यांचीही दाणादाण उडाली. अखेर या प्रकरणात मध्यस्थी करण्यात आली. लवकरात लवकर स्मशानभूमी शेड उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन देण्यात  आले, तसेच माजी मंत्री प्रा. डॉ. आमदार अशोक उईके यांनी तत्काळ दहन शेडसाठी निधी दिला. 

जिल्ह्यातील बहुतांश गावात हीच स्थिती- ग्रामीण विकासाच्या अनेक योजना राबविल्या जातात. त्यानंतरही बहुतांश गावात अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीच नाही. पावसाळ्यात तर अनेक बिकट परिस्थितीला ग्रामस्थांना सामोरे जावे लागते. असा जनक्षोभ इतरही ठिकाणी उठण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :agitationआंदोलन