आझाद मैदान : १०० जोड्या लक्षवेधी, एक लाखांच्या पुरस्कारांचे वितरणयवतमाळ : श्रमाच्या सन्मानासाठी यवतमाळ नगरपरिषदेने पोळ्यात सजून येणाऱ्या बैलांसाठी एक लाख रूपयांचे पुरस्कार घोषित केले होते. त्यामुळे १०० बैलजोड्या मोठ्या थाटात पोळ्यात सहभागी झाल्या होत्या. बैलजोड्यांच्या तंदुरुस्तीसह त्यांच्या साज-श्रृंगारालाही यामध्ये प्राधान्य देण्यात आले. गोदनी येथील नीलेश बढिये यांच्या जोडीने ३१ हजार रूपयांचा पहिला पुरस्कार मिळविला. शनिवारी पोस्टल मैदानावर परंपरागत पोळा सणाचे आयोजन करण्यात आले होते. १०० जोड्यांनी सहभाग नोंदविला. नगरपरिषदेने सुंदर बैलजोड्यांसाठी एक लाख रूपयांचे पुरस्कार वितरित करण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्येक शेतकऱ्याने आपली बैलजोडी उत्कृष्ट ठरण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. काही शेतकऱ्यांनी आपल्यासोबत ढोल-ताशेही आणले होते. या ढोलताशांच्या गजराने पोळ्याचा उत्साह द्विगुणित केला होता.मोरपिसारे, देवी-देवतांचे फोटो, फुगे, कृत्रिम फुले, हार आणि उत्कृष्ठ झुलांसोबतच बैलांच्या गळ्यात घुंगराची माळ सजविली होती. यामुळे निवड समितीही पुरस्कार वितरित करताना अचंब्यात पडली होती. आयोजकांनी सुंदर सजावटीसह आरोग्यसंपन्न जोडीची निवड केली. या निकषात पाच जोड्या बसल्या.
थाटातली जोडी ‘नंबर वन’
By admin | Updated: September 13, 2015 02:11 IST