यवतमाळ : अवघ्या काही वर्षात महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या ‘लोकमत’ कालदर्शिकेचे थाटात प्रकाशन झाले. शनिवारी लोकमत जिल्हा कार्यालयात हा सोहळा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा होते. प्रमुख पाहुणे म्हणून विजय बुक डेपोचे संचालक विजय गंगमवार, श्री बुक डेपोचे संचालक प्रकाश भुरचंडी, स्वागत इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक प्रवीण मुडे, सद्गुरू इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक मनोज गढीकर आदी मान्यवर उपस्थित होते. २०१६ च्या दिनर्शिकेत प्रत्येक घटकातील परिवाराला उपयोगी ठरणारी माहिती अंतर्भूत करण्यात आली आहे. लोकमत कालदर्शिका प्रत्येकाच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
‘लोकमत’ कालदर्शिकेचे थाटात प्रकाशन
By admin | Updated: November 29, 2015 03:13 IST