शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थाळीनाद

By admin | Updated: October 29, 2015 02:55 IST

तालुक्यातील पिकाची पैसेवारी ४० टक्क्याच्या आत घोषित करून शेतकऱ्यांना पीक विम्यासह शासकीय सोयी देण्यात याव्या,

दुष्काळ जाहीर करा : शासनाच्या धोरणाचा निषेध, संपूर्ण कर्जमाफीची मागणीउमरखेड : तालुक्यातील पिकाची पैसेवारी ४० टक्क्याच्या आत घोषित करून शेतकऱ्यांना पीक विम्यासह शासकीय सोयी देण्यात याव्या, या मागणीसोबतच वीज वितरणचा अनागोंदी कारभाराचा निषेध करून जिल्ह्यात महागाई व दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बुधवारी थाळीनाद आंदोलन केले.यावर्षी तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णत: उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले आहे. अशा परिस्थितीत वीज विभागाकडून भारनियमन सुरूच आहे. त्यामुळे उरले सुरले पीकही वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडे वीज नाही. वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. या ज्वलंत प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केले. शासन व प्रशासनाविरुद्ध घोषणा देऊन व्यवस्थेविषयी प्रचंड रोष व्यक्त केला.यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व वीज अभियंत्याला देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे मोहनराव मोरे, भीमराव पाटील चंद्रवंशी, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी वानखडे, उत्तमराव राठोड यांनी निवेदन देवून अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत चर्चा केली. तसेच त्या त्वरित सोडविण्यात याव्या, अशी मागणी केली. सोयाबीन या महत्त्वाच्या पिकाने यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे दगा दिला. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. यातूनच शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबताना दिसत नाही. याला शासनाचे असंवेदनशील धोरणच कारणीभूत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सोयाबीन पिकाची पैसेवारी ४० टक्क्याच्या आत घोषित करावी, वीज वितरण कंपनीच्या लहरीपणाचा फटका बसत असल्याने विजेचा नियमित पुरवठा करण्यात यावा, पैनगंगा नदीवर साखळी बंधारे बांधण्यात यावे, दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे उमरखेड तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे कर्ज पूर्णपणे माफ करण्यात यावे, अशा विविध मागण्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केल्या. यावेळी प्रा.मोहनराव मोरे, माजी नगराध्यक्ष राजूभैय्या जयस्वाल, कल्याणराव माने, शेख इसाराज, उत्तम जाधव, नगरसेवक साजीद जागिरदार, बळवंतराव चव्हाण, सिद्धेश्वर जगताप, प्रदीप पाटील देवसरकर, संजय शिंदे, अमर राठोड, डॉ.रवी चव्हाण, पांडुरंग खापरे, तुळशीराम चव्हाण, सूर्यकांत पंडित आदींसह तालुक्यातील शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. (शहर प्रतिनिधी)