शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:47 IST

गत अनेक वर्षांपासून अंगणवाडी तार्इंचे प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर तोडगा काढण्यात राज्यशासन सपशेल अपयशी ठरले आहे.

पंकजा मुंडे विरोधात नारेबाजी : जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : गत अनेक वर्षांपासून अंगणवाडी तार्इंचे प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर तोडगा काढण्यात राज्यशासन सपशेल अपयशी ठरले आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वात अंगणवाडी तार्इंनी बुधवारी जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन करून केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध नोंदविला. यावेळी महिला आणि बालकल्याण मंत्री पंंंंंंंंंंकजा मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वात बसस्थानक चौकातून अंगणवाडी तार्इंनी मोर्चा काढला. हा मोर्चा थेट जिल्हा परिषदेवर धडकला. यावेळी जिल्हा परिषदेचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. यामुळे अंगणवाडीतार्इंनी मुख्य प्रवेश द्वारासमोर ठिय्या दिला. थाळीनाद करीत नारेबाजी केली. ‘अच्छे दिन कुणाचे, आमदार खासदारांचे’, ‘बुरे दिन अंगणवाडी तार्इंचे’, ‘एक रूपयाचा कडीपत्ता पंकजा मुंडे बेपत्ता’ अशा घोषणा देऊन सरकारच्या धोरणाचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला. यावेळी अंगणवाडी तार्इंनी ‘मानधन नको वेतन हवे’ अशी घोषणा दिली. यावेळी मानधनात भरघोस वाढ करण्याची मागणी करण्यात आली. टिएचआर बंद करा, लाभार्थी आहाराचा दर वाढवून देण्यात यावा, सेवा समाप्ती लाभाची रक्कम देण्यात यावी, रिक्त जागेवर सेविका मदतनिसाची नेमणूक करण्यात यावी, यासह विविध मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. मोर्चाचे नेतृत्व कार्याध्यक्ष मंगला सराफ यांनी केले. विजया सांगळे, अरूणा अलोने, हुकूमताई ठमके, सुषमा पांडे, अनिता कुलकर्णी, माला क्षीरसागर यांच्यासह अनेक अंगणवाडीताई आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.