शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे-मोघेंची ‘डिनर डिप्लोमसी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 23:57 IST

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाची उमेदवारी मिळविण्यासाठी माणिकराव ठाकरे व शिवाजीराव मोघे यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे एकमेकांविरोधात दंड थोपटले असतानाच अचानक त्यांच्यात ‘डिनर डिप्लोमसी’ सुरू झाली.

ठळक मुद्देव्यूहरचना लोकसभेची : निकटवर्तीय अंधारात, पुत्रांसाठी मोर्चेबांधणी

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाची उमेदवारी मिळविण्यासाठी माणिकराव ठाकरेशिवाजीराव मोघे यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे एकमेकांविरोधात दंड थोपटले असतानाच अचानक त्यांच्यात ‘डिनर डिप्लोमसी’ सुरू झाली. दोघांनीही आपल्या निकटवर्तीयांना अंधारात ठेऊन जेवणाच्या टेबलवर लोकसभेच्या संभाव्य व्युहरचनेवर चर्चा केली.मंगळवार १५ जानेवारी रोजी रात्री दत्त चौकात एका शो-रूमच्यावर असलेल्या घरात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांची जेवणाच्या टेबलवर बैठक झाली. बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे अधिकृत बाहेर आले नसले तरी दोन्ही नेत्यांच्या निकटवर्तीयांमध्ये संभाव्य अंदाज बांधले जात आहेत.यवतमाळ-वाशिम लोकसभेसाठी राहुल ठाकरे काँग्रेसचे उमेदवार, त्यांना मोघेंनी मदत करावी आणि तिकडे केळापूर-आर्णी विधानसभा मतदारसंघात जितेंद्र मोघे काँग्रेसचे उमेदवार, त्यांना ठाकरेंनी मदत करावी, मोघे-ठाकरे हे दोन्ही नेते राज्यातच राहून राज्यसभा व विधान परिषदेची चाचपणी करतील आदी मुद्यांवर त्यांच्यात चर्चा झाल्याचे सांगितले जाते. मुळात माणिकराव कोणत्याही परिस्थितीत लोकसभा लढणार नाहीच असे त्यांच्या अवतीभोवती वावरणारे ‘अनुभवी’ कार्यकर्ते सातत्याने छातीठोकपणे सांगत आहेत. या कार्यकर्त्यांचीही तिच इच्छा आहे. दिल्लीत जाऊन काय मिळणार, उलट राज्यात राहिल्यास व आघाडीचे सरकार आल्यास मंत्री पदाचा विचार होऊ शकतो. कार्यकर्त्यांचा हा युक्तीवाद कदाचित माणिकरावांनाही मान्य असावा. म्हणूनच तेही लोकसभेवर जाण्यास इन्टरेस्टेड नसल्याचे सांगितले जाते. मोघेंनाही मुळात दिल्लीत इन्टरेस्ट नाही. राज्यात आदिवासी समाजातून मुख्यमंत्री बनवायचा झाल्यास ज्येष्ठ, सुशिक्षित व दीर्घ अनुभवी म्हणून आपला विचार होऊ शकतो, असे ‘स्वप्न’ त्यांना पडू लागले आहे. शिवाय मुलाचेही राजकीय पुनर्वसन करायचे आहे. त्यामुळेच मोघे-माणिकरावांच्या या ‘डिनर डिप्लोमसी’कडे राजकीयदृष्ट्या गांभीर्याने पाहिले जात आहे.दिल्लीत भांडण, गल्लीत जेवण!एकीकडे मुंबई-दिल्लीत पक्षश्रेष्ठींसमोर भांडायचे, कार्यकर्त्यांनाही भांडत ठेवायचे, वाईटपण घ्यायला लावायचे आणि इकडे गावात निकटवर्तीयांनासुध्दा अंधारात ठेऊन एका ताटात जेवायचे या विसंगतीमुळे दोघांच्याही समर्थकांमध्ये नाराजी आहे. इकडे मोघे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात डॉ.टी.सी. राठोड, जीवन पाटील, डॉ. मोहंमद नदीम आदी स्पर्धक इच्छुकांना सोबत घेऊन फिरतात, आमच्यातील कुणालाही उमेदवारी मिळो, आमच्यासाठी काँग्रेस पक्ष महत्वाचा आहे असे सांगतात. तर दुसरीकडे याच स्पर्धकांना विश्वासात न घेता छुप्यारितीने माणिकरावांसोबत ‘डिनर’ करतात, ही बाब मोघे समर्थक व इच्छूकांना पटलेली नाही. त्यातूनच त्यांच्या गटात त्यांच्याविरोधी वातावरण तयार होत आहे. त्यांच्या समर्थकांपैकीच काहींचा वेगळा गट त्यांच्याचविरोधात तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पुत्रप्रेमापोटी दोन वैरी एकत्रमोघे-माणिकराव एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी असल्याचे चित्र कार्यकर्त्यांपुढे उभे करतात तर दुसरीकडे एकत्र बसून भविष्यातील राजकीय वाटचालीची, मुलांच्या पुनर्वसनाची गोपनीय चर्चा करतात. ही विसंगती कार्यकर्त्यांना न उमगणारी आहे. घराणेशाही व पुत्रप्रेमापोटी हे दोन नेते एकत्र आल्याचे व त्यासाठी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र पहायला मिळत आहे.भाजपाच्या समर्थनार्थ कामविशेष असे, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोघेंनी यवतमाळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात व भाजपाच्या समर्थनार्थ काम केल्याचा सूर पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या गोटातून अजूनही आळवला जातो आहे. एवढेच नव्हे तर मोघेंनी आपल्या दुसºया एका वजनदार काँग्रेस नेत्यालासुद्धा विरोधात काम करायला लावले होते. निवडणुकीनंतर या नेत्यानेच मोघेंचा मोबाईल संदेश माणिकरावांना दाखविल्याचेही बोलले जाते.दिल्लीत पक्षश्रेष्ठींपुढे एकमेकांविरोधात थोपटतात दंडमोघे लोकसभा लढविण्याबाबत सिरीयस नाहीत, त्यांनी वयाची पंच्याहत्तरी गाठली आहे, ओपन मतदारसंघात अनुसूचित जमातीच्या व्यक्तीला उमेदवारी कशी असा माणिकरावांचा दिल्लीतील युक्तीवाद आहे. तर माणिकराव २० वर्षांपासून निवडणूक लढले नाहीत, गेल्या निवडणुकीत त्यांनी दिलेल्या विधानसभेतील काँग्रेसच्या चार उमेदवारांना ‘एकूण’ ६७ हजार मते मिळाली, त्यांचा मुलगा चौथ्या क्रमांकावर फेकला गेला, याच चार मतदारसंघात लोकसभेत चारच महिन्यात आपल्याला दोन लाखांवर मते मिळाली, माणिकरावांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीत एकही जागा निवडून आणली नाही, त्यांच्या कार्यक्षेत्रातील एकही नगरपरिषद, बाजार समिती, पंचायत समिती काँग्रेसच्या हाती नाही हा मोघेंचा माणिकरावांविरोधातील युक्तीवाद आहे.

टॅग्स :Manikrao Thakareमाणिकराव ठाकरेShivajirao Mogheशिवाजीराव मोघे