शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

भेदरलेल्या नजरेत वाघाची दहशत

By admin | Updated: November 5, 2016 00:38 IST

वाघ दिसला, शिवारात आला, जनावरे मारली, अमक्याला ठार मारले, या चर्चा परिसरातील नागरिकांच्या हृदयाची धडधड वाढवित आहे.

शेती कामांना मिळाला अर्धविराम : राळेगावात गुराख्यांनीही सोडली जंगलाची वाटअशोक पिंपरे  राळेगाववाघ दिसला, शिवारात आला, जनावरे मारली, अमक्याला ठार मारले, या चर्चा परिसरातील नागरिकांच्या हृदयाची धडधड वाढवित आहे. नरभक्षक वाघाने तालुक्याच्या जवळपास २० गावांमध्ये दहशत निर्माण केली आहे. दररोज कुठली तरी वार्ता कानावर पडते आहे. गावशिवारात असलेल्या शेतातील कामे अर्धवट राहात आहे. गुराख्यांनी तर जंगलाची वाट सोडून दिली आहे. गावकऱ्यांच्या भेदरलेल्या नजरांमध्ये वाघाची दहशत स्पष्टपणे दिसून येत आहे. वाघाचा बंदोबस्त कधी करणार हा त्यांचा प्रश्न आहे. तालुक्याच्या जंगलपट्ट्यातील सराटी, बोराटी, खैरगाव, तेजनी, वरूड, लोणी बंदर, पिंपळखुटी, कोळवण, सोयटी, झरगड, वरध, सावरखेडा, झोटिंगदरा, मजरा, निंबगव्हाण आदी गावे वाघाच्या दहशतीत आहे. बोराटी येथील सोनाबाई वामन घोसले, झोटिंगदरा येथील सखाराम लक्ष्मण टेकाम, खैरगाव(कासार) येथील मारोती विठोबा नागोसे आणि तेजनी येथील प्रवीण पुंडलिक सोनवणे हे वाघाच्या हल्ल्यात ठार झाले आहेत. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, गुराखी यापैकी कुणीही कामावर जाण्यास धजावत नाही. शेतात कापूस, तूर पीक काढणीला आले आहे. पण, कुणीही यासाठी तयार होत नाही. तालुक्यातील रस्ते अंधार होण्यापूर्वीच सामसूम होतात. एरवी रात्री उशिरापर्यंत दुचाकीने प्रवास करणाऱ्यांचीही संख्या नगण्य आहे. काही शेतकरी शेतात जाण्याचा प्रयत्न करतात. स्वसंरक्षणासाठी सोबत कुऱ्हाड नेतात. मात्र वनविभागाचे कर्मचारी हिसकावून घेतात, असा आरोप आहे. लक्ष्मण दुधकोहळे, रामभाऊ काळसर्पे यांनी ही समस्या मांडली. दरम्यान, आमदार प्रा.डॉ. अशोक उईके, उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, वनसंरक्षक विजय हिंगे यांनी वाघाचा बळी ठरलेल्या तेजनी यैथील प्रवीण सोनवणे याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी या गावातील नागरिकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. वाघाचा बंदोबस्त करा, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा गावकऱ्यांनी दिला. सोबतच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मिळत असलेल्या वागणुकीविषयीसुद्धा तक्रार केली.आमदार डॉ. उईके गावात पोहोचताच संपूर्ण गाव रस्त्यावर आले. प्रसंगी सुधाकर जुनघरे, जयवंत हिवरकर, झित्रू ठाकरे, यादव कोटनाके, मधुकर बहाळे, अवी डंभारे, लक्ष्मण दुधकोहळे यांनी शेतकरी शेतमजुरांना संरक्षण देण्याची मागणी केली. त्याचवेळी आमदारांनी वाघाची शोध मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.वनविभागाकडून उपाययोजनापरिसरातील दहा गावातील दहा स्वयंसेवक निवडून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ते जंगलाचा अभ्यास करतील. वाघाचे वास्तव्य असलेल्या ठिकाणाची पाहणी करतील. त्यांच्या सोबतीला ब्रह्मपूरी येथील पथक राहील. हे पथक वाघ पकडण्यात निपून आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात वाघ पकडण्याचे प्रयत्न सुरू राहील, असे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, विजय हिंगे यांनी सांगितले. मात्र गावकऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त तत्काळ करा, असे या अधिकाऱ्यांना सांगितले.