शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 18:11 IST

राळेगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत पिसाळलेल्या कुत्र्याने गुरुवारी सकाळी अनेकांना चावा घेतला. या घटनेची माहिती गावात पसरताच भीतीचे वातावरण निर्माण झाले.

ठळक मुद्दे१४ जणांना चावानगरपंचायतीने कुत्र्याला केले ठार

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शहरातील मुख्य बाजारपेठेत पिसाळलेल्या कुत्र्याने गुरुवारी सकाळी अनेकांना चावा घेतला. या घटनेची माहिती गावात पसरताच भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले. काही मिनिटातच १४ जणांना या कुत्र्याने गंभीर स्वरूपाचा चावा घेतला.दैनंदिन कामकाजासाठी राळेगावकर नागरिक घराबाहेर निघाले असता बाजारपेठेत फिरणाऱ्या कुत्र्याने चावा घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला एक-दोघांना या कुत्र्याने चावा घेतला असावा, अशी माहिती होती. मात्र राळेगाव ग्रामीण रुग्णालयात कुत्र्याने चावा घेतल्याचे रुग्ण एका पाठोपाठ एक यायला सुरुवात झाली. यावरून हे प्रकरण गंभीर असल्याचे दिसून आले. अखेर याची माहिती नगरपंचायतीला देण्यात आली. नगरपंचायतीने तातडीने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले. मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी दिलेल्या आदेशावरून आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांनी या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडून ठार केले. त्यानंतर राळेगावकर नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. ग्रामीण रुग्णालयात ११ जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश चिमणानी यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :Socialसामाजिक