शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना विषाणूने घेतला दहावा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:01 IST

रविवारी मृत्यू झालेल्या इसमावर गेल्या काही दिवसांपासून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डात उपचार सुरू होते. ‘क्रिटीकल’ अवस्थेतही त्याला वाचविण्यासाठी मेडिकल यंत्रणेने अखेरपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. मात्र शनिवारी रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. हा ७५ वर्षीय मृतक मूळचा नेर तालुक्यातील पाथ्रडगोळे या गावातील रहिवासी होता.

ठळक मुद्देमालखेडच्या वृद्धाचा मृत्यू : आणखी एकाला बाधा, अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह ५७

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नियंत्रणात आला-आला म्हणतानाच कोरोना विषाणू जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हातपाय पसरवित आहे. कोरोनाची लागण झालेल्या आणखी एका वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील हा कोरोनाचा साडेतीन महिन्यातील दहावा बळी ठरला.रविवारी मृत्यू झालेल्या इसमावर गेल्या काही दिवसांपासून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डात उपचार सुरू होते. ‘क्रिटीकल’ अवस्थेतही त्याला वाचविण्यासाठी मेडिकल यंत्रणेने अखेरपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. मात्र शनिवारी रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. हा ७५ वर्षीय मृतक मूळचा नेर तालुक्यातील पाथ्रडगोळे या गावातील रहिवासी होता.तर त्याच वेळी नेर तालुक्यातील मालखेड येथील आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल मेडिकल प्रशासनाला रविवारी प्राप्त झाला. त्यामुळे जिल्ह््यात सुरुवातीपासून आतापर्यंत नोंदविण्यात आलेल्या कोरोना रुग्णांची एकंदर संख्या २७३ इतकी वाढली आहे. तर ५७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत.आतापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाने चार हजार ६६६ नमुने तपासणीकरिता पाठविले होते. यापैकी चार हजार ५०७ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. १५९ रुग्णांचा अहवाल अद्यापही अप्राप्त आहे. गत २४ तासात वैद्यकीय महाविद्यालयाला ११५ रिपोर्ट प्राप्त झाले. यातील ११४ अहवाल निगेटिव्ह आले आहे. आयसोलेशन वार्डात सध्या ६८ नागरिक भरती आहेत. त्यांना निगराणीत ठेवण्यात आले आहे.नेर, दारव्हा, दिग्रसचे १६ रुग्ण कोरोनामुक्तजिल्ह्यात कोरोनामुळे दहा मृत्यूची नोंद झाली असली तरी उपचारादरम्यान दुरुस्त होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत २०७ रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. रविवारी नेरमधील सात, दारव्हा येथील पाच तर दिग्रसमधील चार रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यामुळे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डातून सुटी दिली.इतर तालुके ‘अलर्ट’दारव्हा, नेर तालुक्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही या दोन्ही ठिकाणी लक्ष केंद्रित केले आहे. तर इतर तालुक्यांमधील यंत्रणाही ‘अलर्ट’ झाली आहे. वणी शहरात तर पाच दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. दिग्रस, उमरखेड, पुसद, महागाव, आर्णीतही दक्षता घेतली जात आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या