शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

चौथीच्या शाळेने दिली सातव्या वर्गाची टीसी

By admin | Updated: December 24, 2014 23:07 IST

तालुक्यातील पांढुर्णा खु. येथील सामकी माता अपंग निवासी विद्यालयाला इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शासन मान्यता असताना येथील माजी प्रभारी मुख्याध्यापिकेने शाळेच्या चपराशासोबत

गुन्हा दाखल : पांढुर्णा येथील निवासी विद्यालयातील प्रकारपुसद : तालुक्यातील पांढुर्णा खु. येथील सामकी माता अपंग निवासी विद्यालयाला इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शासन मान्यता असताना येथील माजी प्रभारी मुख्याध्यापिकेने शाळेच्या चपराशासोबत संगनमत करून एका विद्यार्थ्याला चक्क इयत्ता सातवी उत्तीर्णतेची टीसी दिल्याचा अफलातून प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी खोटे दस्तावेज तयार करून संस्थेची फसवणूक व दिशाभूल केल्याबद्दल सदर मुख्याध्यापिकेसह शिपायावर पुसद ग्रामीण पोलिसांवर गुन्हे दाखल केले आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. शोभा रमेश पिलाजी (४७) रा.हटकेश्वर वॉर्ड पुसद व उल्हास सुका पवार (४५) रा.पारवा ही गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. या प्रकरणी सदर संस्थेचे विद्यमान प्रभारी मुख्याध्यापक तथा अधीक्षक अनिल लखू चव्हाण यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. सामकी माता अपंग निवासी विद्यालयाला इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शासन मान्यता आहे. १९९६ पासून पांढुर्णा येथे शाळा सुरू असून २६ जून २००७ पर्यंत शोभा रमेश पिलाजी या सदर शाळेत विशेष शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. दरम्यान या कालावधीत त्यांनी मुंगशी येथील एका विद्यार्थ्याला खोटे दस्तावेज तयार करून इयत्ता सातवी उत्तीर्णतेची टीसी दिली. त्यामुळे त्यांनी शाळेची फसवणूक व बदनामी केल्याचा आरोप पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीत शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात आला आहे. करण्यात आला असून या कामात त्यांना शाळेचा शिपाई उल्हास सुका पवार याने मदत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, याच कालावधीत सदर शिक्षिकेने बीड जिल्ह्यातील एका अनुदानित शाळेत सेवा दिली. त्यामुळे एकाच शिक्षिकेने दोन ठिकाणी शासन मान्य संस्थांमध्ये नोकरी करून वेतन घेऊन शासनाची फसवणूक केली आहे, अशा प्रकारची तक्रार अनिल चव्हाण यांनी पुसद ग्रामीण पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी शोभा पिलाजी व उल्हास पवार या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. या बनावट दस्तावेज प्रकरणामागे पुसद शहरातील बसस्थानक परिसरातील एक नामांकित डॉक्टर असल्याचीही चर्चा आहे. या प्रकरणी पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)