शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

दहावी विज्ञानचा पेपर फुटला

By admin | Updated: March 16, 2016 08:39 IST

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे दहावीचा विज्ञानाचा पेपर परीक्षा सुरू होण्याच्या आधीच फुटला. मोबाईलवरुन तो

पांढरकवडा : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे दहावीचा विज्ञानाचा पेपर परीक्षा सुरू होण्याच्या आधीच फुटला. मोबाईलवरुन तो बाहेर पाठविण्याचा मनसुबा मात्र उधळला गेला. या प्रकरणी केंद्र प्रमुखासह तिघांना अटक करण्यात आली आहे. केंद्र प्रमुख दिलीप चौधरी, सहायक केंद्राधिकारी श्रीकांत आणि विनोद भांडेकर अशी या तिघांची नावे आहे. पांढरकवडा येथील विकास हिंदी विद्यालयात हा गंभीर प्रकार घडला. तेथे माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत दहावीचे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. या केंद्रावर मंगळवारी विज्ञान-२ विषयाचा पेपर होता. हा पेपर फोडून मोबाईलद्वारे त्याचा फोटो बाहेर पाठवून प्रश्नपत्रिकांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार शैलेश काळे यांना मिळाली. त्यावरुन त्यांनी ठाणेदार गुलाबराव वाघ, दुय्यम ठाणेदार राखी गेडाम यांना सोबत घेऊन सकाळी ९.४५ वाजता विकास हिंदी विद्यालय गाठले. तेथे केंद्र प्रमुखाच्या कक्षाची तपासणी केली असता प्रश्नपत्रिकेचा एक गठ्ठा फोडलेल्या अवस्थेत आढळून आला. शिवाय केंद्र प्रमुख दिलीप चौधरी, विनोद भांडेकर, श्रीकांत व्ही. यांच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यात सदर प्रश्नपत्रिकेचे फोटो आढळून आले. त्यामुळे त्यांचे मोबाईल जप्त करुन तिघांनाही ताब्यात घेण्यात आले. हे तिघेही मोबाईलहून फोटो काढून शाळेच्या बाहेर जाण्याच्या तयारीत असतानाच तहसीलदार व ठाणेदारांनी धाड घालून त्या तिघांना ताब्यात घेत त्यांचा मनसुबा उधळला. या प्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात आयटी अ‍ॅक्टच्या कलम ७२, माल प्रॅक्टीस प्रिव्हेन्शन अ‍ॅक्टच्या कलम ५ आणि भादंविच्या कलम १८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर या परीक्षा केंद्रावर विज्ञान-२ चा पेपर सुरळीत पार पडला. तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)