शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्टने दिग्रसमध्ये तणाव

By admin | Updated: November 11, 2015 01:53 IST

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत व्हॉटस्अ‍ॅपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली.

गुन्हा दाखल : भाजपा कार्यकर्ते आग्रही, नेत्यांकडून मात्र अडथळेदिग्रस : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत व्हॉटस्अ‍ॅपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली. त्यामुळे दिग्रसमध्ये तणाव निर्माण झाला. कार्यकर्ते कारवाईसाठी आग्रही असताना यवतमाळातील नेत्यांकडून मात्र ‘सामाजिक बांधिलकी’ जोपासण्यासाठी त्यात अडथळे निर्माण केले गेले. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाचे पानीपत झाले. एकहाती सत्ता अपेक्षित असताना प्रत्यक्षात भाजपा आघाडीला केवळ ५८ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालाच्या पार्श्वभूमीवर सोशल साईटस्वर भाजपा व त्या पक्षाच्या नेत्यांबाबत टिका-टिप्पणी केली जात आहे. अशीच एक आक्षेपार्ह पोस्ट दिग्रसमध्ये टाकली गेली. त्यात नरेंद्र मोदी यांना निशाणा बनविले गेले. ही बाब भाजपाच्या एका जागरुक पदाधिकाऱ्याच्या निदर्शनास येताच त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलाविली. प्रकरण दिग्रस पोलीस ठाण्यात पोहोचले. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून ठाणेदार संजय देशमुख यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि २९५ अ कलमान्वये गुन्हा नोंदविला. मात्र या प्रकरणात वेगळेच राजकारण शिजले. सूत्रानुसार, या प्रकरणात पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी म्हणून भाजपाचे दिग्रसमधील पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड आक्रमक व आग्रही होते. त्याच वेळी ही कारवाई होऊ नये म्हणून थेट दुबईतून भाजपाच्या यवतमाळातील नेत्यापर्यंत सूत्रे हलली. त्यानंतर नेत्यांनी यात काहीशी मवाळ भूमिका घेण्याच्या सूचना पोलीस व दिग्रसमधील कार्यकर्त्यांना केल्याचे सांगितले जाते. मात्र गुन्हा दाखल झाल्याने फार काही करता आले नाही. दरम्यान याप्रकरणी दिग्रसमध्ये भाजपाचे दोन गट पडले. एका गटाने ती आक्षेपार्ह पोस्ट थेट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांना पाठविली. त्याचे गांभिर्य ओळखून दानवे यांनी यवतमाळातील भाजपा नेत्याला ‘टाईट’ केले. त्यामुळे हा नेता ईकडे मित्रत्व आणि तिकडे पक्ष अशा दुहेरी कोंडीत सापडला. या प्रकरणी संशयिताचा शोध घेणे सहज शक्य असताना राजकीय दबावामुळे आरोपी अज्ञात दाखविला गेल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)