नेर तालुका : चाकूने मानेवर केले होते वार लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या नेर तालुक्यातील चिकणी डोमगा येथील आरोपीला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. नाजुकराव देवराव देशभ्रतार (५०) रा. चिकणी डोमगा ता. नेर, असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने ६ मार्च २०१३ रोजी दुपारी गावातील रामहरी मेश्राम यांच्यावर चाकूने मानेवर हल्ला केला होता. या प्रकरणी अनिल रामहरी मेश्राम यांच्या तक्रारीवरून नेर पोलिसांनी भादविंच्या कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला होता. सहायक पोलीस निरीक्षक दीपक गावंडे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात न्यायाधीश एस.सी. मोरे यांनी दहा साक्षीदार तपासले. त्यापैकी जखमी, वैद्यकीय अधिकारी व तपासी अधिकाऱ्याची साक्ष ग्राह्य मानून आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील नरेंद्र पांडे यांनी काम पाहिले.
हल्ल्यातील आरोपीला दहा वर्षांचा कारावास
By admin | Updated: May 13, 2017 00:21 IST