शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सांगा, पाणीटंचाईवर काय उपाययोजना केल्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 21:28 IST

शहरात भीषण पाणीटंचाई आलेली असताना जिल्हाभरात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. यवतमाळवर ‘फोकस’ ठेवताना जिल्ह्याच्या टंचाईवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची नजर आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना हवे उत्तर : जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतींचा आज आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात भीषण पाणीटंचाई आलेली असताना जिल्हाभरात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. यवतमाळवर ‘फोकस’ ठेवताना जिल्ह्याच्या टंचाईवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची नजर आहे. म्हणूनच शुक्रवारी सोळाही नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या मुख्याधिकाºयांनी पाणीटंचाईवर नेमकी काय पावले उचलली, याचा आढावा घेतला जाणार आहे.गेल्या आर्थिक वर्षात नगरपरिषदांनी पूर्ण केलेल्या कामांबाबत जिल्हाधिकाºयांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता बैठक बोलावली आहे. इतर कामांसोबतच पाणीटंचाईचा प्रश्न बैठकीच्या केंद्रस्थानी राहणार असल्याने सर्व मुख्याधिकाऱ्यांनी स्वत:च उपस्थित राहिले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत. यवतमाळप्रमाणेच बहुतांश नगरपरिषदांमधील पाणीपुरवठ्याची भिस्त शहरालगतच्या धरणांवर आहे. पांढरकवड्याची तहान सायखेडा धरणावर, घाटंजीचा पाणीपुरवठा आता येळाबारा धरणावर भागवायचा का, अशा हालचाली सुरू आहेत. परंतु, नेमके उपाय काय करता येतील, याबाबत बैठकीत खल होणार आहे.शिवाय, नुकतेच आर्थिक वर्ष संपले आहे. गेल्या वर्षात कोणती कामे झाले, त्यावरील निधीचा विनियोग मुख्याधिकाऱ्यांनी कसा केला, याबाबतचाही आढावा जिल्हाधिकारी घेणार आहेत. त्यासाठी २०१३-१४ ते २०१६-१७ या वर्षांत नगरपरिषदांनी ज्या-ज्या कामांसाठी प्रशासकीय मान्यता घेतली होती, त्या कामांची संपूर्ण माहिती मागविण्यात आली आहे.यवतमाळ शहरातील भीषण पाणीटंचाईवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख नजर ठेऊन आहेत. शहरात टंचाईच्या काळात नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी झालेल्या उपाययोजना आणि आगामी काळात होणाऱ्या उपाययोजनांबाबत या बैठकीत ते माहिती घेणार आहेत. शहरात टंचाईच्या काळात नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत असून बैठकीत त्यावर खल होणार आहे. ही बैठक शहराच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.यवतमाळ शहरातील टंचाई उपाययोजनेबाबत उत्सुकतासर्व मुख्याधिकाऱ्यांकडून पाणीटंचाईचा आढावा घेताना यवतमाळच्या प्रश्नावर प्रचंड खल होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक संकट, त्यात नगरपरिषदेतील दोन पक्षांचा संघर्ष यात टंचाईनिवारणाच्या कामांचा आढावा सादर करताना मुख्याधिकाऱ्यांचा कस लागणार आहे. शिवाय, ३१ मार्चअखेर मालमत्ता आणि पाणीपट्टीची वसुली किती झाली, हेही सांगावे लागणार आहे. यवतमाळात मालमत्ता करावरून वादंग माजलेले आहे. अन् पाणीच नाही तर पाणीपट्टी वसुली किती झाली असावी, हाही प्रश्न आहे. एकंदरीत शहरातील पाणी प्रश्न गुंतागुंतीचा होत आहे.

टॅग्स :Waterपाणी