शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणातील ठिबक महाराष्ट्राच्या माथी

By admin | Updated: May 22, 2016 02:14 IST

दोन राज्यातील अनुदानाचा फरक लक्षात घेता तेलंगणातील ९० टक्के सबसिडीवर मिळणारे ठिबक सध्या मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात भंगार...

अनुदानाचा गोरखधंदा : चार हजारांच्या साहित्याची दोन हजार रुपयांत विक्रीसंजय भगत महागावदोन राज्यातील अनुदानाचा फरक लक्षात घेता तेलंगणातील ९० टक्के सबसिडीवर मिळणारे ठिबक सध्या मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात भंगार विक्रेत्यामार्फत सहज उपलब्ध होत आहे. एका बंडलमागे चार हजार रुपये मोजण्याची गरज असताना भंगार विक्रेत्यांकडून ते दोन हजारात सहज मिळत आहे. तेलंगणामध्ये ९० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना ठिबक मिळत आहे. तेच ठिबक महाराष्ट्रात ५० टक्के अनुदानावर आहे. तेलंगणात अनुदानाची रक्कमही लगेच दिली जाते. त्यामुळे ठिबक खरेदी करताना शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडत नाही. विशेष म्हणजे एक लाख रुपयाच्या ठिबकसाठी १० हजार रुपये भरावे लागतात. त्याउलट महाराष्ट्र सरकारचे अनुदान धोरण आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या खात्यात वळती केली जाते. या योजनेत फायदा घेवू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी ठिबकची खरेदी रक्कम पूर्ण भरून नेमून दिलेल्या कंपनीकडून खरेदी करावयाची आहे. खरेदी केल्याची पावती कृषी विभागाला दाखवल्यानंतर शेतकऱ्याला सबसिडी देण्याची शिफारस कृषी विभागामार्फत करण्यात येते. ही लांबलचक प्रक्रिया असून २०१४-१५ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी ठिबक योजना घेतली अशा एकट्या महागाव तालुक्यातील १५०० शेतकऱ्यांचे दीड कोटी रुपये त्यांच्या खात्यात वळते झालेले नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विचार केल्यास जवळपास २० कोटी रुपयांचे अनुदान रखडले आहे. त्यामुळे ठिबक योजनेकडे आता राज्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. तेलंगणातील शेतकरी ९० टक्के अनुदानावर ठिबक घेवून भंगार विक्रेत्याला विकत आहे. ठोक विक्रेत्यामार्फत आयएसआय ट्रेडमार्क असलेल्या आणि ट्रेडमार्क नसलेल्या अशा दोन प्रकारच्या पाईपचा वापर केला जात आहे. अनुदानाच्या या गोरखधंद्यात आता जळगाव, खान्देश, नांदेड, जिंतूर येथील व्यापारी मोठ्या प्रमाणात उतरले आहे.