शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

‘जेडीआयईटी’मध्ये टेक्नो-एक्स्ट्रीम राष्ट्रीय परिषद

By admin | Updated: April 25, 2017 01:07 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात आयटी, सीएसई, ईक्स टीसी, इलेक्ट्रीकल या विभागातर्फे ‘टेक्नो एक्स्ट्रीम-२०१७’ ही राष्ट्रीय परिषद घेण्यात आली.

यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात आयटी, सीएसई, ईक्स टीसी, इलेक्ट्रीकल या विभागातर्फे ‘टेक्नो एक्स्ट्रीम-२०१७’ ही राष्ट्रीय परिषद घेण्यात आली. आयजेएफईटी (इंटरनॅशनल जर्नल फॉर इंजिनिअरिंग अप्लीकेशन्स अँड टेक्नॉलॉजी) व आयईटीई यवतमाळ उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला होता. परिषदेचे उद्घाटन बीएसएनएलचे सिनिअर जनरल मॅनेजर ए.आर. सावतकर यांच्या हस्ते झाले. माँ सरस्वती आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमा पूजनाने परिषदेला सुरुवात झाली. राष्ट्रीय परिषदांमुळे विद्यार्थ्यांमधील संशोधन व तांत्रिक गुणांना वाव मिळत असल्याचे ए.आर. सावतकर यांनी यावेळी सांगितले.या परिषदेत देशाच्या विविध भागातील ५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत सीएसई व आयटी ग्रुपमध्ये प्रथम स्नेहल देशमुख, द्वितीय विधी सावला व ग्रुप, तृतीय पारितोषिक प्रथमेश जयसिंगपुरे यांनी पटकाविले. इलेक्ट्रीकलमध्ये शंकर पवार व ग्रुपने प्रथम, आशुतोष भेदरकर व अनिकेत भुरभुरे द्वितीय, तर तृतीय पारितोषिक कल्याणी राठोड व सयद शाहिद फजल यांना प्राप्त झाले. मेकॅनिकलमध्ये प्रथम पारितोषिक निखिल शिरभाते व ग्रुप, द्वितीय चिराग पांडे व ग्रुप, तृतीय पारितोषिक अभिषेक काळमेघ व गु्रपने प्राप्त केले. ईक्सटीसीमध्ये प्रथम पारितोषिक नेहा मोरे व ग्रुप, द्वितीय समीक्षा गुल्हाने व ग्रुप, तृतीय सुमेध डोंगरे व ग्रुप, प्रोजेक्ट प्रेझेंटेशनमध्ये सीएसई व आयटी ग्रुपमध्ये प्रथम पारितोषिक धनश्री मोगरकर व ग्रुप, द्वितीय आंचल बत्रा व ग्रुप, तृतीय पारितोषिक तृषाली हिंडोचा यांनी प्राप्त केले. मेकॅनिकलमध्ये प्रथम पारितोषिक वैभव खंडारे व ग्रुप, ईक्सटीसी व इलेक्ट्रीकल ग्रुपमध्ये प्रसाद निळजकर व ग्रुप, द्वितीय पारितोषिक वृषाली पाटील व ग्रुप, तर तृतीय पारितोषिक श्रद्धा शेलुकर व ग्रुप यांनी पटकाविले.परिषदेच्या अंतिम सत्रात विजेत्यांना रोख पारितोषिक, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. संचालन अयुरी लिमजे व स्वप्नील बंब यांनी केले. आभार प्रा. ओंकार चांदुरे यांनी मानले. परिषदेच्या आयोजनासाठी डॉ. डी.एन. चौधरी, डॉ. ए.डी. राऊत, डॉ. एस.एम. गुल्हाने, प्रा. जे.एच. सातुरवार, डॉ. पी.एम. पंडित, प्रा. एम.आर. शहाडे, प्रा. ओ.व्ही. चांदुरे, प्रा. के.जी. पुरोहित, प्रा. एस.एल. ठोंबरे, प्रा. जे.एस. वानखेडे, प्रा. ए.डी. पाटील, प्रा. पी.व्ही. शिरभाते, प्रा. वाय.व्ही. ढेपे, प्रा. ए.बी. काटोले, प्रा. ए.आर. वसुकर, प्रा. व्ही.आर. पंडित, प्रा. बी.एम. फारूख, प्रा. ए.एस. शिरभाते, प्रा. के. विद्याशेखर, प्रा. व्ही.आर. शेळके, प्रा. ए.एन. काझी, प्रा. एन.एस. गवई, प्रा. के.एस. हांडे, प्रा. ए.ए. गोफणे, प्रा. एम.पी. कावलकर, प्रा. ए.एस. इंगळे, प्रा. ए.ए. पाचघरे, प्रा. ए.डी. बोरखडे, प्रा. आर.जी. मुंधडा, प्रा. एस.एम. जावके, प्रा. एस.ए. खडतरे, प्रा. ए.एन. शिरे, प्रा. डी.डी. शिरभाते, प्रा. एस.ए. फनान, प्रा. एम.के. पोपट, प्रा. व्ही.व्ही. भेले, प्रा. एस.ए. मिश्रा, प्रा. एस.ए. लिंगावार, प्रा. एस.आर. जाठे, प्रा. पी.ए. पाटील, प्रा. ए.पी. शिंगाडे, प्रा. सी.एस. धामंदे, प्रा. ए.पी. बक्षी, प्रा. जी.के. गायधने, प्रा. एच.डी. गुरड, प्रा. ए.आर. मनक्षे, प्रा. पी.डी. हेगू, प्रा. एन.आर. पटेल आदींनी पुढाकार घेतला. परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी आयोजकांचे कौतुक केले. (वार्ताहर)