शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

शिक्षकांनो, तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 01:56 IST

डोक्याची खिचडी : सहा वर्षांचा हिशोब हवा

अविनाश साबापुरे ।यवतमाळ : शालेय पोषण आहार योजनेतून कोणत्या शाळेत किती विद्यार्थ्यांना मोफत खिचडी मिळते याची कधीही वास्तपूस्त न करणाऱ्या शासनाने आता चक्क तांदळाची रिकामी पोती विकून पैसा जमविण्याचा आदेश शाळांना दिला आहे. गेल्या सहा वर्षात शाळांमध्ये आलेली तांदळाची पोती विकून तो पैसा शासनजमा करण्याचे आदेश शुक्रवारी धडकल्याने मुख्याध्यापकांची पाचावर धारण बसली आहे.शिक्षण विभागाने चक्क रिकाम्या पोत्यांचा हिशेब मागितला आहे. प्राथमिक शिक्षण संचालक सुनिल चौहान यांनी हे आदेश बजावले आहेत. २०१२ ते २०१८ या सहा वर्षांत शाळांना किती तांदूळ मिळाला, याचा हिशेब शाळांकडे नोंदविलेला आहे. मात्र, रिकाम्या पोत्यांचा हिशेब मागण्यात आल्याने शिक्षक भांबावलेले आहेत.सर्वशिक्षाचे होणार ‘आॅडिट’सर्व शिक्षा अभियानातून शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. दरवर्षी या योजनेचे लोकलेखा समितीकडून लेखापरीक्षण केले जाते तेव्हा रिकाम्या पोत्यांचा हिशेब मागितला जातो. मात्र अनेक शाळा तो देत नाही. त्याबाबत पुढे कोणीच विचारपूसही करीत नव्हते. सर्वशिक्षा अभियान बंद करून समग्र शिक्षा अभियान यंदा सुरू होत आहे. त्यामुळेच लेखा परीक्षणात सर्वशिक्षा अभियानातील इत्थंभूत हिशेब ‘खरडून’ घेतला जात आहे.

टॅग्स :educationशैक्षणिक