शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

शिक्षकांच्या आपसी बदल्याचे भिजत घोंगडे

By admin | Updated: October 25, 2014 22:47 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून सातत्याने ग्रामविकास विभागाच्या आदेशाची पायमल्ली केली जात असून शिक्षकांच्या आपसी बदल्याचे भिजत घोंगडे दोन वर्षापासून कायम आहे.

यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून सातत्याने ग्रामविकास विभागाच्या आदेशाची पायमल्ली केली जात असून शिक्षकांच्या आपसी बदल्याचे भिजत घोंगडे दोन वर्षापासून कायम आहे. ऐन दिवाळीच्या सुट्या संपताना शिक्षण विभागाकडून बदलीच्या कार्यवाहीचा देखावा केला जातो. मात्र शाळा सुरू झाली की हा विषय मागे पडतो. त्यामुळे जिल्ह्यातील १४० शिक्षकांची बदलीप्रकरणे रखडली आहे. जिल्हा परिषदेत २०१३ पासून शिक्षकांच्या आपसी बदलीची प्रक्रियाच राबविण्यात आली नाही. २०१३ च्या दिवाळीत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बदली झाल्याची सबब पुढे करण्यात आली होती. विशेष म्हणजे याच काळात राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांनी शिक्षकांच्या आपसी बदल्यांची प्रक्रिया पुर्ण केली. यवतमाळ जिल्हा परिषद याला अपवाद ठरली. आपसी बदली प्रक्रियेत आर्थिक उलाढाल होत नसल्याने यासाठी प्रशासना याबाबत फारसे गंभीर राहत नसल्याची वस्तुस्थिती आहे. जिल्ह्यात २०११ आणि २०१२ या वर्षात प्रशासकीय बदलीने वेगवेगळया पंचायत समितीत कार्यरत असलेले १४० शिक्षक आपसी बदलीसाठी पात्र आहेत. मात्र अशा पात्र शिक्षकांची यादी प्रसिध्द करण्याची तसदी सुध्दा शिक्षण विभागाने घेतली नाही. २०१३ मध्ये शिक्षक आपल्या हक्कापासून वंचित राहील्याने २२ आॅगस्ट २०१४ मध्ये ग्रामविकास विभागाने सुधारित आदेश काढून दिवाळीच्या सुट्टी मध्ये शिक्षकांच्या आपसी बदलीची प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश दिले. आपसी बदलीचा मुद्दा घेऊनच प्राथमिक शिक्षक संघाने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतरही शिक्षणविभागाकडून कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. दिवाळी सुटी ही १ आॅक्टोबर पर्यंतच आहे. त्यापूर्वीच आपसी बदलीची प्रक्रिया पुर्ण करण्याचे निर्देश सीईओ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले आहे. मात्र अद्यापही शिक्षण विभागाकडून बदली पात्र शिक्षकांची यादी सुध्दा लावण्यात आली नाही. अतिशय संथपणे कारभार सुरू असल्याने दिवाळच्या सुट्या संपेपर्यंत प्रक्रिया पुर्ण केली जाते की, नाही अशी भीती शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभाग हा सातत्यानेच चर्चेत राहीला आहे. येथील वादग्रस्त कारभाराची परंपार अजुनही कायम असल्याचे दिसून येते. वरिष्ठांच्या आदेशानंतरी येथील यंत्रणा फारसी गांभीर्याने काम करत नसल्याचा अनुभव अनेकांना आला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)