शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

परीक्षेच्या तोंडावर शिक्षकांचा ‘ई-मॉडेल शाळा’ अभ्यास दौरा

By admin | Updated: March 24, 2015 23:54 IST

शालेय परीक्षा अवघ्या काही दिवसावर आल्या असताना जिल्ह्यातील काही केंद्रातील शिक्षक ‘ई’ वर्गाच्या मॉडेल्स शाळा पाहण्यासाठी ठाणे-मुंबईला गेले आहेत.

यवतमाळ : शालेय परीक्षा अवघ्या काही दिवसावर आल्या असताना जिल्ह्यातील काही केंद्रातील शिक्षक ‘ई’ वर्गाच्या मॉडेल्स शाळा पाहण्यासाठी ठाणे-मुंबईला गेले आहेत. आपल्या भागातील विद्यार्थ्यांना या शाळांचा फायदा करून देता येईल, हा या मागील उद्देश असल्याचे सांगितले जाते. मात्र उन्हाळ््याच्या सुटीत हा दौरा काढता आला नसता काय, असा प्रश्न पालकांमधून उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शनासाठी सध्याचा कालावधी अतिशय महत्त्वाचा आहे. ही बाब शिक्षकांना अभ्यास दौऱ्यावर पाठविताना गांभिर्याने घेण्यात आली नाही. यापूर्वी जिल्ह्याच्या अनेक केंद्रातील शिक्षकांनी ‘ई’ वर्गाच्या मॉडेल्स शाळा अभ्यासल्या. मात्र आता परीक्षेच्या तोंडावरच तिवसा आणि मंगरूळ केंद्राच्या प्रमुखांसह या केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळेतील जवळपास ३८ ते ४० शिक्षक २६ मार्चपर्यंत अभ्यास दौऱ्यावर आहेत. प्रत्येक शाळेतून दोन ते तीन शिक्षक शाळा पाहणीसाठी गेले आहेत. या शिक्षकांना शिक्षण विभागानेच सुट्या मंजूर केल्या आहे. यावरून शिक्षण विभागही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रती किती दक्ष आहे, हे स्पष्ट होते. शिक्षक स्वखर्चाने हा दौरा करत असल्याचे मात्र शिक्षण विभागाकडून आवर्जून सांगितल्या जाते. दौऱ्याच्या खर्चाचा भार शिक्षण विभागावर पडत नसला तरी विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान त्यापेक्षा अधिक महागात पडणारे ठरू शकते. काही पालकांनी ही बाब जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांकडे मांडली. यावर काय कारवाई होत याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)