शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मेटीखेडा येथील केंद्रशाळेला शिक्षक तुटवड्याचे ग्रहण

By admin | Updated: July 17, 2017 01:49 IST

मेटीखेडा केंद्र शाळेत शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे. आवश्यक तेवढे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे कठीण झाले आहे.

पाच वर्ग : १२३ विद्यार्थ्यांसाठी तीन शिक्षक, शिक्षणाचा खेळखंडोबानिश्चल गौर । लोकमत न्यूज नेटवर्कडोंगरखर्डा : मेटीखेडा केंद्र शाळेत शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे. आवश्यक तेवढे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे कठीण झाले आहे. आधीच अपुरे शिक्षक आणि त्यातच प्रशासनातील कामे वाढली आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. मेटीखेडा केंद्र शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग आहेत. पहिला आणि पाचवा वर्ग सेमी इंग्लिश आहे. या शाळेची पटसंख्या १२३ एवढी आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी केवळ तीन शिक्षक कार्यरत आहे. त्यातही मुख्याध्यापकांना मध्यान्ह भोजन, मतदार याद्या यासोबतच अनेक प्रकारची अशैक्षणिक कामे करावी लागत आहे.या शाळेचा शैक्षणिक दर्जा चांगला असल्याने सतत तीन वर्षांपासून पटसंख्याही वाढत आहे. पुणे येथील शाळा सिद्धी बाह्य मूल्यमापन विद्या प्राधिकरणाने या शाळेला भेट दिली होती. शाळेचा झालेला विकास पाहून शाळा सिद्धीचा अ श्रेणी दर्जाही या शाळेला बहाल करण्यात आला. आता मात्र शिक्षकांचा तुटवडा असल्याने दर्जा घसरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील अनेक शाळांमध्ये नगण्य पटसंख्या आहे. तरीही दोन शिक्षक त्याठिकाणी कार्यरत आहेत. मेटीखेडा केंद्र शाळेत आवश्यकता असतानाही शिक्षक उपलब्ध करून देण्यास चालढकल सुरू आहे. कळंब पंचायत समिती शिक्षण विभागाचे याकडे दुर्लक्ष सुरू असल्याचा आरोप पालकांमधून होत आहे.