शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक प्रशिक्षणाच्या निधीचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 22:06 IST

शिक्षक प्रशिक्षणाच्या नावाखाली शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा चुराडा केला जात आहे. प्रशिक्षणार्थ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा न करताच अवाढव्य खर्च दाखविण्यात येत आहे.

ठळक मुद्देसुविधांची बोंबाबोंब : नेरमध्ये तीन दिवसांचा वर्ग, भोजनही सुमार

किशोर वंजारी ।ऑनलाईन लोकमतनेर : शिक्षक प्रशिक्षणाच्या नावाखाली शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा चुराडा केला जात आहे. प्रशिक्षणार्थ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा न करताच अवाढव्य खर्च दाखविण्यात येत आहे. भोजनासाठी ३०० रुपये प्रती प्रशिक्षणार्थी मिळत असताना अतिशय निकृष्ट भोजन त्यांना दिले गेले. याशिवाय इतर बाबतीतही सुविधांची बोंबाबोंब होती.पहिली ते पाचवीच्या शिक्षकांसाठी संख्याज्ञान व संख्येवरील क्रियासंबोध विकसन शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम येथे घेण्यात आला. तीन-तीन दिवसांच्या या प्रशिक्षणात प्रत्येक शाळेतील एका शिक्षकाला प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यासाठी संबंधित प्रशासनाकडून निधी उपलब्ध करुन देण्यात आला. दर्जेदार भोजन, सर्वसोयीयुक्त हॉल राहील एवढा निधी दिला गेला. नेर तालुक्यासाठी एक लाख ६२ हजार २०० रुपये प्राप्त झाले. तीन दिवस झालेल्या प्रशिक्षणात १७१ शिक्षक सहभागी झाल्याचे दाखविण्यात आले.एका प्रशिक्षणार्थी शिक्षकाच्या भोजनासाठी ३०० रुपये खर्चाची सूचना होती. प्रत्यक्षात निकृष्ट भोजन देण्यात आले. प्रशिक्षण सरकारी शाळेतील एका लहानशा खोलीत घेण्यात आले. शिवाय प्रवासभत्ताही देण्यात आला नाही. प्रशिक्षणाच्याा ठिकाणी एलसीडी प्रोजेक्टरही लावण्यात आले नाही. बैठक व्यवस्था चादरीवर होती. कुठल्याही सुविधा पुरविलेल्या नसताना १ लाख ६२ हजाराचा खर्च कुठे करण्यात आला हा प्रश्न येथे उपस्थित केला जात आहे. शालेय पुस्तके शाळेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी इतरांची असताना हे काम शिक्षकांनाच करावे लागले. स्वत:च्या खिशाला कात्री लागली. नेर येथील शिवाजी हायस्कूलमधून पुस्तकांचे गठ्ठे शिक्षकांनाच न्यावे लागले. यासंपूर्ण प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक