शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक भरतीसाठीची प्रक्रिया पुन्हा झाली सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 03:45 IST

आता पुन्हा ही प्रक्रिया ‘अनलॉक’ झाली असून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी शाळांचे प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा पोर्टलवर सुरू करण्यात आली आहे.

अविनाश साबापुरे यवतमाळ : तीन वर्षांपूर्वी घोषित केलेली आणि वर्षभरापूर्वी प्रत्यक्ष पवित्र प्रणालीमार्फत सुरू झालेली शिक्षक भरती न्यायालयीन कचाट्यातून सुटल्यावरही कोरोनामुळे अडखळली होती. मात्र आता पुन्हा ही प्रक्रिया ‘अनलॉक’ झाली असून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी शाळांचे प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा पोर्टलवर सुरू करण्यात आली आहे.गेल्या वर्षी ९ आॅगस्टला राज्य शासनाने पवित्र पोर्टलद्वारे मुलाखतीशिवाय नियुक्ती द्यावयाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. तर ५ सप्टेंबरला ऐन शिक्षक दिनी हजारो उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्तीपत्रेही प्रदान केले. मात्र त्यानंतर मुलाखतीसह नियुक्तीचा पर्याय निवडलेल्या उमेदवारांची निवड यादी प्रलंबित राहिली. त्यानंतर झालेला सत्ताबदल, न्यायालयीन प्रकरणे यामुळे पुढची प्रक्रिया रखडली होती. त्यातच कोरोना संकटामुळे वित्त विभागाने ४ मे रोजीच्या निर्णयानुसार भरती प्रक्रियेवर बंदी आणली.परंतु आता ठप्प पडलेल्या पवित्र पोर्टलला पुन्हा एकदा गती आली असून गुरुवारी उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ३१ आॅगस्ट ही अखेरची मुदत देण्यात आली आहे.त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही शिक्षक दिनीच उमेदवारांना गोड बातमी कळण्याची दाट शक्यता आहे. रयत संकल्प डीएड, बीएड संघटनेचे राज्याध्यक्ष परमेश्वर इंगोले पाटील यांनीही याला दुजोरा दिला आहे.>कोणी भरावे प्राधान्यक्रमआता माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक पदासाठी प्राधान्यक्रम देता येईल.ज्यांना यापूर्वी ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्याने उच्च माध्यमिकचे प्राधान्यक्रम आले नव्हते, परंतु त्यांनी पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण केली, त्यांना प्राधान्यक्रम भरता येईल.तसेच माध्यमिक गटासाठी पदवीला ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्याने ज्यांना प्राधान्यक्रम आले नव्हते, त्यांनाही आता मुलाखतीसह पदाचे प्राधान्यक्रम भरता येणार आहे.ज्यांनी यापूर्वीच मुलाखतीसह संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केले, त्यांना प्राधान्यक्रम देण्याची गरज नाही.>प्राथमिक शिक्षकांच्या १५६० जागा आता रिक्त आहेत. तर एकूण जाहीर केलेल्या १२ हजार १४० जागांपैकी पाच हजार ८२२ जागा अजून भरणे बाकी आहे.