शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या भांडणाला हाच कारणीभूत.. पत्नीशी मोबाइल चॅटिंग करणाऱ्यावर शिक्षकाचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 17:21 IST

अंजनेय सोसायटी ही व्यक्ती आपल्या पत्नीशी मोबाइलवर चॅटिंग करते. त्यावरून भांडणे होतात, यामुळे संतापलेल्या पतीने सदर व्यक्तीचा शोध घेत त्याच्या घरी जाऊन राडा केला.

ठळक मुद्देअंजनेय सोसायटीतील घटना गुन्हा दाखल करून पोलिसांनी केली अटक

यवतमाळ : पत्नीशी सतत मोबाइल चॅटिंग करणाऱ्या व्यक्तीचा शोध काढत किनवट येथील एक शिक्षक यवतमाळात पोहोचला. त्याने अंजनेय सोसायटीतील त्या व्यक्तीच्या घरी जावून राडा केला. झटापट केली व आपला संताप व्यक्त केला. याप्रकरणी संबंधित महिलेच्या तक्रारीवरून शिक्षकाविरुद्ध अवधूतवाडी पोलिसांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला. त्या शिक्षकाला अटकही केली.

जितेंद्र धोंदे (४०) रा. किनवट जि. नांदेड असे अटक झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. जगदीश मेघराम जांगीड (४४) रा. अंजनेय सोसायटी ही व्यक्ती आपल्या पत्नीशी मोबाइलवर चॅटिंग करते. त्यावरून भांडणे होतात, यामुळे संतापलेल्या जितेंद्र धोंदे याने यवतमाळ गाठले. १० जानेवारीला सकाळी ८ वाजता धोंदे जगदीश जांगीड यांच्या घरी पोहोचला. तेथे त्याने तू माझ्या पत्नीला व्हॉटस्ॲपवर का बोलतो, असे विचारत धक्काबुक्की करणे सुरू केले. आरडाओरडा करून शिवीगाळ केली.

जांगीड यांना सोडविण्यासाठी त्यांची पत्नी धावून आली. तिलाही धोंदे याने हाताने ढकलून दिले. जांगीडकडील मोबाइल हिसकावून घेतला. ही झटापट झाल्यानंतर तो शिक्षक निघून गेला. याप्रकरणी जांगीड यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन अवधूतवाडी पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर पाेलीस उपनिरीक्षक नागेश खाडे यांनी शिक्षक जितेंद्र धोंदे याला किनवट येथून अटक केली. अधिक तपास सुरू आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मर्जीतील फिर्यादी

बांधकाम क्षेत्राशी निगडित असलेल्या जगदीश जांगीड यांच्या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या निर्देशावरूनच गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर त्या शिक्षकाच्या अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात पाेलीस तत्परतेने तपास करीत आहेत. या कारवाईबद्दल पोलीस वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारMobileमोबाइल