शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात मुख्याध्यापकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 13:43 IST

शिक्षक नेत्यासह मुख्याध्यापकाच्या जाचाला कंटाळून एका शिक्षकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना महागाव तालुक्यातील बेलदरी येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देमहागाव तालुक्याच्या बेलदरीची घटनासात पानाच्या चिठ्ठीत शिक्षक नेता, मुख्याध्यापक आणि शिक्षकाचे नाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिक्षक नेत्यासह मुख्याध्यापकाच्या जाचाला कंटाळून एका शिक्षकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना महागाव तालुक्यातील बेलदरी येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली. पुसद पंचायत समितीच्या काटखेडा शाळेत कार्यरत या शिक्षकाने मृत्युपूर्व सात पानाची चिठ्ठी लिहून जाच देणाऱ्या तिघांची नावे स्पष्टपणे नमूद केली आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.मनोहर वसंत जाधव (३७) रा. बेलदरी असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते पुसद पंचायत समितीच्या काटखेडा शाळेत विशेष शिक्षक म्हणून कार्यरत होते. रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांनी पत्नीला मोबाईल करून आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. यामुळे घाबरलेल्या पत्नीने नातेवाईकांना माहिती दिली. त्यांचा शोध सुरू केला असता रात्री १० वाजताच्या सुमारास त्यांची दुचाकी आणि पाकीट शेतातील विहिरीजवळ आढळून आले. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने रात्री शोध घेता आला नाही. या घटनेची माहिती महागाव पोलिसांना देण्यात आली. दरम्यान सोमवारी सकाळी या विहिरीचे पाणी उपसल्यानंतर मनोहर जाधव यांचा मृतदेह आढळून आला. तसेच विहिरीवर ठेवलेल्या पाकीटात सात पानांची चिठ्ठी आढळून आली. ही चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली.मृत्युपूर्व चिठ्ठीत त्यांनी आपल्याला काटखेडा शाळेचे मुख्याध्यापक संतोष नारायण शेवाळकर, सहायक शिक्षक अश्विन शिवलाल चव्हाण आणि केंद्रांतर्गत मुंगसाजीनगर शाळेचे मुख्याध्यापक तथा महाराष्ट पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष राठोड यांच्या नावाचा उल्लेख आहे. या तिघांनी आपला मानसिक छळ केला. मुख्याध्यापक आणि सहायक शिक्षक शाळेत शिकवत नव्हते. मुलांना साधी इंग्रजीही येत नाही, याबाबत आपण केंद्र प्रमुखांकडे तक्रार केली. तेव्हापासून आपल्याला मानसिक त्रास सुरू झाला. या दोघांना शिक्षक संघटनेच्या नेत्याने सहकार्य केले. आपले जीवन जगणे कठीण झाले, यामुळेच आपण आत्महत्या करीत असून आपल्याला आत्महत्येला केवळ तिघेच जबाबदार असल्याचे या चिठ्ठीत स्पष्टपणे नमूद केले आहे.दरम्यान, नातेवाईकांच्या विनंतीवरून विहिरीजवळच सोमवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान शवविच्छेदनास सुरुवात झाली. यावेळी परिसरातील नागरिकांची प्रचंड गर्दी केली होती. सदर शिक्षकाच्या मागे पत्नी वर्षा, मुलगा, मुलगी आणि आई-वडील आहे.

मनोहर म्हणतो, हे कलियुग आहे, येथे चोर सोडून संन्याशालाच फाशी मिळणारशिक्षक मनोहर जाधव यांनी आपल्या पत्नी वर्षाच्या नावे एक चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीत त्यांनी तिला जीवनभर साथ देऊ शकलो नाही, याची खंत व्यक्त करीत ह्यहे कलियुग आहे, या युगात चोर सोडून संन्याशालाच फाशी मिळणार आहे असे लिहिले आहे. स्वत:चे जीवन ईश्वराला समर्पित करून जीवन जगण्याचा सल्ला देत सर्वांना सांभाळण्यासही या चिठ्ठीत त्यांनी सांगितले आहे. ईश्वराच्या न्यायालयात या लोकांना जरुर शिक्षा मिळेल, कारण तेथे पैसा, राजकीय संबंध चालत नाही, असेही म्हटले आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्या