शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘चाय पे चर्चा’ नव्हे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:31 IST

तालुक्यातील दाभडी हे गाव २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीतील ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमाने देशभर गाजले. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासाठी चहा बनविणाऱ्या अमोल रामभाऊ दिवाने ......

ठळक मुद्देदाभडीतील वास्तव : मोदी यांच्यासाठी चहा बनविणाराच हतबल

ऑनलाईन लोकमतआर्णी : तालुक्यातील दाभडी हे गाव २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीतील ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमाने देशभर गाजले. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासाठी चहा बनविणाऱ्या अमोल रामभाऊ दिवाने या शेतकऱ्यावरच आता शेताच्या रस्त्यासाठी उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे.गेल्या २0१४ मधील लोकसभा निवडणुकीपासून दाभडी हे गाव सतत चर्चेत आहे. निवडणुकीनंतर तर गाव आणखीच प्रकाशझोतात आले. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच गावाला त्यावेळी भेट दिली होती. त्यांनी गावातील ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमात सहभागी होऊन शेतकरी, नागरिकांशी दिलखुलास संवाद साधला होता. भाजपाला सत्ता देण्याचे आवाहन केले होते. नंतर देशात परिवर्तन होऊन मोदी थेट पंतप्रधान झाल्याने साहजिकच गावकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या. मात्र गावकऱ्यांच्या साध्या समस्याही सुटणे आता कठीण झाल्याचे दिसत आहे.दाभडीतील ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमासाठी गावातील शेतकरी अमोल रामभाऊ दिवाने यांच्या घरी बनविण्यात आला होता. त्यामुळे अमोल दिवाने चर्चेत आले. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना आपली समस्या सुटेल असे वाटले होते. मात्र झाले उलटेच. गेल्या काही वर्षांपासून अमोल आपल्या शेतात जायला रस्ता नसल्याने त्रासून गेले आहे. रस्त्यासाठी त्यांनी वारंवार लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडे पाठपुरावा केला. ‘आपले सरकार पोर्टल’वर तक्रार देऊनही लाभ झाला नाही. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार राजू तोडसाम यांना समस्या सांगूनही उप्योग झाला नाही. यामुळे हतबल झालेल्या अमोल दिवाने यांनी सोमवारपासून आर्णी तहसीलसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.शेती राहिली पडिकशेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अमोल दिवाने यांची शेती पडीत राहिली आहे. त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शेती पडीत असल्याने त्यांना आर्थिक फटका बसत आहे. ‘मोदी साहेब’ प्रधानमंत्री झाले, भाजपाचेच हंसराज अहीर खासदार अन् केंद्रात राज्यमंत्री बनले, तर राजू तोडसाम आमदार झाले. तरीही न्याय मिळत नसल्याबद्दल दिवाने यांनी संताप व्यक्त केला आहे. अखेर न्यायासाठीच आमरण उपोषणाचा मार्ग पत्करल्याचे त्यांनी सांगितले.