शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शेतात राबून शिकविले अन् घडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:20 IST

शेतात राबून आईने शिकविले आणि मुलांनी तिच्या कष्टाचे चिज केले. पितृछत्र हरविल्याने आईवर येऊन पडलेल्या जबाबदारीचे भान राखत तिच्या आशा आकांक्षा पूर्ण केल्या.

ठळक मुद्देखंडाळाची मायमाऊली : तिनही मुले पोलीस विभागात

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : शेतात राबून आईने शिकविले आणि मुलांनी तिच्या कष्टाचे चिज केले. पितृछत्र हरविल्याने आईवर येऊन पडलेल्या जबाबदारीचे भान राखत तिच्या आशा आकांक्षा पूर्ण केल्या. खंडाळा या छोट्याशा गावातील मायमाऊलीची तिनही मुले आज पोलीस विभागात कार्यरत आहे.बेबीनंदा संजय कळंबे यांची ही गुणवान मुले आहेत. आपल्या संघर्षाची कथा सांगताना बेबीनंदा गहीवरून गेल्या. पतीचे १९ वर्षांपूर्वी निधन झाल्याने कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. घरी चार एकर शेती असली तरी, लागवड खर्चही निघणार नाही एवढेच उत्पादन होत होते. तीन मुलांचे शिक्षण, घरखर्च करताना दमछाक होत होती. मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शेतमजुरी केली. पोरांनीही जिद्दीने शिक्षण घेतले. आज मोठा मुलगा जितेश संजय कळंबे हा राखीव पोलीस दलात आहे. २०१४ मध्ये मुलगी लिना पोलीस विभागात रुजू झाली. सध्या ती लाडखेड येथे कार्यरत आहे. तिसरा मुलगा दिनेश याची नुकतीच पोलीस विभागात निवड झाली.मोठा जितेश नोकरीला लागल्यापासून कुटुंबाला आधार झाला. दोन लहान भावंडांचे शिक्षण पूर्ण केले. वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनाने लहान दोघांनीही त्याच्या पावलावर पाऊल ठेवत यश मिळविले. या तिनही मुलाचे प्राथमिक आणि बारावीपर्यंतचे शिक्षण वटफळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात झाले. परिस्थिती बेताची असली तरी खचून जाऊ नका, जिद्दीने सामना करा. मुलांना शिकवून घडवा, असे संदेश बेबीनंदा कळंबे देतात.

टॅग्स :educationशैक्षणिक