शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

तस्कर शेख चाँद वनविभागाला शरण

By admin | Updated: December 5, 2015 09:09 IST

यवतमाळ वन विभागातील अवैध वृक्षतोड प्रकरणाचा सूत्रधार शेख चाँद शेख रहेमान (५०) हा अखेर शुक्रवारी पांढरकवडा वन परिक्षेत्र कार्यालयाला शरण आला.

सागवान तस्करी : पिंपळखुटी चेक पोस्टवरील प्रकरण, चार दिवसांची वनकोठडी पांढरकवडा : यवतमाळ वन विभागातील अवैध वृक्षतोड प्रकरणाचा सूत्रधार शेख चाँद शेख रहेमान (५०) हा अखेर शुक्रवारी पांढरकवडा वन परिक्षेत्र कार्यालयाला शरण आला. येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एन.एच. तिखे यांच्यापुढे शेख चाँदला हजर केले असता ७ डिसेंबरपर्यंत त्याला वन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पांढरकवडा वन परिक्षेत्र अधिकारी बाबाराव पवार यांच्या पथकाने १५ आॅक्टोबर २०१५ रोजी महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी चेक पोस्टवर सागवानाचा ट्रक पकडला होता. चौकशी दरम्यान हे सागवान अवैध व त्यावरील हॅमरही बोगस असल्याचे निष्पन्न झाले. एवढेच नव्हे तर अशा पद्धतीने हैदराबादकडे आठ व नागपूरकडे पाच ट्रक सागवान अवैधरीीत्या पाठविल्या गेल्याचे उघड झाले. या प्रकरणाचा सूत्रधार शेख चाँद असल्याचे निष्पन्न झाले. मात्र तो गेल्या दोन महिन्यांपासून फरार होता. अखेर शुक्रवारी तो वन विभागाला शरण आला. मात्र वन विभागाने गुरुवारी सायंकाळी शेख चाँदच्या घरी जाऊन कुटुंबीयांची समजूत घातली, तो अटक न झाल्यास त्याच्या पुढे कशा अडचणी वाढतील हे सांगितले. त्यानंतर आज पहाटे शेख चाँदला त्याच्या यवतमाळातील घरी अटक केल्याचा दावा आरएफओ बाबाराव पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. त्याच्या ताब्यातून बोगस हातोडा-हॅमर जप्त करण्यात आला. या प्रकरणी शेख चाँदचा दिवाणजी आणि ट्रक चालक-वाहकाला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. दिवाणजीने सागवान तोडीतील वास्तव उघड केले होते. चोरीतील हे सागवान यवतमाळ वन विभागांतर्गत येणाऱ्या संरक्षित जंगलांमधील असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावर वन यंत्रणेच्या संगनमताने बोगस हॅमर मारले गेल्याचे उघड झाले. मात्र त्यानंतरही या वृक्षतोड व बोगस हॅमर प्रकरणी वन खात्यात अद्याप कुणावरच कारवाई झालेली नाही, हे विशेष. शेख चाँद अटक झाल्याने तो आपल्या बयाणात आता काय उघड करतो, कुणा-कुणाची नावे घेतो, याकडे लक्ष लागले आहे. शेख चाँदच्या अटकेने त्याच्याशी वन खात्यात राहून वृक्षतोडी व बोगस हॅमरसाठी हातमिळवणी करणाऱ्या वन अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (तालुका प्रतिनिधी)