शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

टँकर वस्तीतून जातो, पण थांबत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 21:36 IST

शहरात पाणी कुठेच नाही. नगरपरिषदेने टँकर लावून तात्पुरती तहान भागविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र व्यवस्थेतील कीडे हे पाणीही मधल्या मध्ये पळवून नेत आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव परिसर पाणी मागणाऱ्या मजुरांना दमदाटी, आम्ही माणसे नव्हे काय ?

रुपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात पाणी कुठेच नाही. नगरपरिषदेने टँकर लावून तात्पुरती तहान भागविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र व्यवस्थेतील कीडे हे पाणीही मधल्या मध्ये पळवून नेत आहे. पिंपळगाव परिसरातील काही वसाहतींमधून रोज टँकर जातो, पण थांबत नाही. लोकांनी टँकर थांबवून पाणी मागितले तर त्यांना पोलिसांकरवी दमदाटी करून हाकलून लावले जात आहे. या स्थितीने चिडलेल्या नागरिकांनी ‘आम्ही माणसे नव्हे का?’ असा संतप्त सवाल थेट जिल्हाधिकाºयांकडे उपस्थित केला आहे. टँकर मिळाला नाही तर अख्खी वसाहतच जिल्हाधिकारी कार्यालयात मुक्कामाला येईल, असे रीतसर पत्र जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहे.यवतमाळ नगरपरिषदेत नव्याने समाविष्ट झालेल्या पिंपळगावमधील विसावा कॉलनी, झोपडपट्टी वसाहतीसह प्रभाग चारमधील नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहे. या भागात पाण्याची तजवीज करण्यासाठी दोन टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी अर्धा ड्रम पाणी आले. यामुळे नागरिकांनी संताप नोंदविला. तेव्हापासून या भागातील काही लाईनला टँकरचे पाणी आलेच नाही. आता या भागातून टँकर जाताना दिसतात, मात्र ते काही लाईनमध्ये थांबत नाही. सगळे लोक त्याकडे भिरभिर नजरेने पाहतात. २२ दिवसांपासून नळ आला नाही. यामुळे घरातला प्रत्येक सदस्य रोज पाण्यासाठी हापशीवर जातो, असे लता भोंगे म्हणाल्या.रात्री २ वाजतापर्यंत हापशीवर वर्दळ असते. दिवसभर काम केल्यानंतर रात्री पाणी भरावे लागते, असे शालिनी शेंडे म्हणाल्या. रात्री हापशीवर लाईटचीही व्यवस्था नाही. थंडाव्यात सापही असतात. घरातल्या चिल्यापिल्यांसह पाण्यासाठी धावपळ करावी लागते. बॅटरी घेऊन पाणी भरावे लागते, असे नलू पडोळे, अर्चना मडावी, वेणू बावनकर म्हणाल्या.आम्ही महागडे पाणी विकत घेऊ शकत नाही. म्हणूनच नगरपरिषदेने पाण्याची मोफत व्यवस्था केली. पण आम्हाला त्या टँकरचे पाणी भेटले नाही. आम्ही रोज हापशीवरच पाणी भरतो. नगरसेविकेकडे वारंवार पाणी मागितले. आम्हाला पाणी भेटले नाही. पण पोलीस बोलावून हाकलून लावले. आम्हाला पाणी भेटणार नाही का? आम्ही रोजमजुरी करतो म्हणून आमचा पाण्याचा हक्क काढून घेतला का? आम्ही पाण्यासाठी कुठे जायचे, असे प्रश्न शुभम मामीडवार, अमोल चोले, राजेश ढेंगे, आकाश मेश्राम, प्रशांत इंगोले यांनी उपस्थित केले. रोजमजुरीत मिळवलेला सारा पैसा पाण्यासाठी खर्च करायचा का? मग खायचे काय? आम्ही अ‍ॅक्वाचे पाणी लावू शकत नाही. एकच हापशी आमच्या वाट्याला आहे. या भागातले लोक दररोज टँकरची वाट पाहतात. पण टँकर काही केल्या थांबत नाही. झोपडपट्टीत तर हा टँकर फिरकलाच नाही, असे त्यांनी सांगितले.जिल्हा कचेरीत ठोकणार मुक्कामपाणीच नसल्याने आम्ही वैतागलो आहे. आता आमची क्षमता संपली आहे. ९ एप्रिलपर्यंत पाण्याचे टँकर सुरू झाले नाही, तर आम्ही लोक जिल्हाधिकारी कार्यालयात मुक्काम ठोकणार आहे. तसे रितसर निवेदन जिल्हाधिकाºयांना दिल्याचे सचिन कदम, नितीन महल्ले आणि अरविंद मडावी यांनी सांगितले.नगरसेविकेने भरला दमया भागातील नागरिकांनी पाण्यासाठी नगरसेविकेला दूरध्वनी केला. टँकर कधी पाठविता, असे विचारले. मात्र त्यांनी त्यावर उत्तर देणे टाळले. या भागातला टँकर अजिबात रोखायचा नाही, असा दम भरला. त्याचे मोबाईल रेकॉर्डिंग नागरिकांकडे आहे. या ध्वनीफितीसह जिल्हा प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे, संतप्त नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी