शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

नागरिकांनो सांंभाळून; पाळत ठेवून लूटमार वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 05:00 IST

सुरेश गोविंद पवार (४२, रा. बोरगाव पुंजी) हे बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कर्जाचे पैसे भरण्यासाठी आले होते. अचानक त्यांच्या अंगाला खाज सुटली. खाज असह्य झाल्याने सुरेश पवार यांनी हातातील रोख रकमेची पिशवी पायाजवळ ठेवली व ते अंग खाजवू लागले. या सर्व प्रकारावर लक्ष ठेवून असलेल्या अज्ञात भामट्याने पवार यांची नजर चुकवून रोख रक्कम असलेली पिशवी लंपास केली. ही सर्व घटना अगदी काही मिनिटात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ/आर्णी/महागाव : शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांत लूटमारीच्या घटना वाढल्या आहेत. विशेषत: गर्दीच्या जागांसह बॅंक परिसरात पाळत ठेवून सर्वसामान्यांची लूट केली जात आहे. मंगळवारी जिल्ह्यात अशा तीन घटना पुढे आल्या. आर्णीमध्ये बॅंकेत शेतकऱ्याची पाळत ठेवून एक लाख ३० हजारांची रक्कम लंपास करण्यात आली, तर महागाव तालुक्यातील फुलसावंगीत पिकअप अडवून दीड लाख रुपये लुटण्यात आले. गंभीर बाब म्हणजे शनिवारी याच परिसरात नकली बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली होती. आर्णी येथील शिवनेरी चाैकातील बँक ऑफ इंडियामध्ये रोख रक्कम भरण्यासाठी बोरगाव पुंजी येथील शेतकरी आले होते. त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या दोन भामट्यांनी खाजेची पावडर अंगावर टाकून रोख रक्कम असलेली पिशवी त्यांनी पळविली. तब्बल एक लाख ३० हजार रुपये या भामट्यांनी नेले. हा प्रकार लक्षात आला तेव्हा बराच उशिर झाला होता. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली. सुरेश गोविंद पवार (४२, रा. बोरगाव पुंजी) हे बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कर्जाचे पैसे भरण्यासाठी आले होते. अचानक त्यांच्या अंगाला खाज सुटली. खाज असह्य झाल्याने सुरेश पवार यांनी हातातील रोख रकमेची पिशवी पायाजवळ ठेवली व ते अंग खाजवू लागले. या सर्व प्रकारावर लक्ष ठेवून असलेल्या अज्ञात भामट्याने पवार यांची नजर चुकवून रोख रक्कम असलेली पिशवी लंपास केली. ही सर्व घटना अगदी काही मिनिटात घडली. त्यामुळे पवार यांना काय प्रकार आहे हे लक्षात आले नाही. खाजेपासून स्वत:ला सावरत त्यांनी खाली ठेवलेली पिशवी उचलण्याचा प्रयत्न केला असता ती आढळून आली नाही. कुणीतरी आपल्याला टार्गेट करून रोख रक्कम पळविल्याचे लक्षात येताच सुरेश पवार यांनी आर्णी पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक शिवराज पवार यांच्याकडे सोपविला आहे. तर महागाव तालुक्यातील महागाव-फुलसावंगी रस्त्यावर चिल्ली इजारा शिवारात दोन मोटारसायकलस्वारांनी व्यापाऱ्याचे वाहन थांबवून त्याला मारहाण केली व त्याच्या जवळून दीड लाख रुपये रोख व मोबाइल हिसकावून पळ काढला. ही घटना सोमवारी रात्री १० वाजता घडली. योगेश बजरंग बारसे (रा. नवी आबादी, हदगाव, जि. नांदेड) हा वाहनचालक डेली निड्स किराणा व्यापाऱ्याकडे कामाला आहे. तो उमरखेड मार्गावरून दगडथर चिल्ली इजारा मार्गे फुलसावंगी येथे जाण्याकरिता निघाला होता. फुलसावंगी येथून काही व्यापाऱ्यांकडून रोख रक्कम घेऊन तो परतीच्या मार्गावर निघाला. चिल्ली इजारा गावाजवळ रात्री १० वाजताच्या दरम्यान पाठीमागून मोटारसायकलने आलेल्या दोन अज्ञातांनी गाडी थांबविली व चालक योगेश याला मारहाण केली. त्याच्या खिशातील एक लाख ३८ हजार ६०० रुपये रोख, मोबाइल असा मुद्देमाल हिसकावून घेतला.  परराज्यातील आरोपी असण्याचा पोलिसांचा संशय असून, इराणी टोळीवर लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान, या घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी सर्व पथकांना निर्देश दिले. शिवाय अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्यासह पोलिसांचे विशेष पथक  या गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे. 

गर्दीच्या ठिकाणी घ्या विशेष खबरदारी- विविध सोहळे, मिरवणुका तसेच लग्न कार्याच्या ठिकाणी गर्दीचा गैरफायदा घेऊन लूट करणाऱ्या टोळ्या कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे दोन-चार जणांची अशी टोळी पाळत ठेवून पैसे, दागदागिन्यांसह ऐवज लंपास करीत आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. त्यातच येणाऱ्या दिवसांत मोठ्या प्रमाणात मुहूर्त असल्याने लग्न सोहळेही थाटामाटात होणार आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. प्रवासामध्येही पाळत ठेवून लूटमार केल्याच्या घटना मागील काही दिवसांत पुढे आलेल्या आहेत.

शोभायात्रेतून सोन्याचे दागिने लंपास- यवतमाळ : रामनवमी शोभायात्रा बघण्यासाठी शहरातील गणेश चौक येथे किराणा दुकानासमोर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातून अज्ञाताने दागिने लंपास केले. रामनवमी शोभायात्रेनिमित्त अनेक नागरिक रस्त्यावर येतात. त्यामुळे मोठी गर्दी होते. याचाच फायदा घेऊन मीना अमोल सुरणकर (रा. जयरामनगर, माळीपुरा) या महिलेच्या गळ्यातून एक लाख ८७५ रुपये किमतीचे दागिने चोरट्याने लंपास केले. याप्रकरणी शहर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

 

टॅग्स :Thiefचोर