शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गणवेशासाठी मुलींचे माप महिलांच्या समक्ष घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 14:23 IST

विद्यार्थिनींच्या गणवेशासाठी माप घेताना केवळ महिला शिवण कामगारच असावी, असे आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिले आहेत.

ठळक मुद्दे पुढील सत्रासाठी समग्र शिक्षा अभियानाची लगबग सुरू

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शालेय विद्यार्थिनींना मोफत गणवेश दिला जातो. त्यासाठी गावातील टेलर मंडळीकडून विद्यार्थिनींचे माप घेतले जाते. मात्र, आता विद्यार्थिनींच्या गणवेशासाठी माप घेताना केवळ महिला शिवण कामगारच असावी, असे आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिले आहेत. शिवाय, असे माप घेताना गावातील प्रतिष्ठि महिला उपस्थित ठेवण्याचेही आदेश आहेत.शालेय परिसरात महिला अत्याचाराच्या वाढत असलेल्या घटना बघता यंदा ही खबरदारी घेतली जात आहे. आगामी २०२०-२१ या शैक्षणिक सत्रातही समग्र शिक्षा अभियानातून मोफत गणवेश योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात संबंधित शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात थेट पैसे वळते केले जाणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत गणवेश देता यावा, यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने आतापासूनच तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.यासंदर्भात परिषदेचे सह संचालक राजेंद्र पवार यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ६ मार्चला लेखी आदेश दिला. शाळांनी चालू शैक्षणिक सत्र संपण्यापूर्वीच गणवेशासाठी विद्यार्थ्यांची मापे घेण्याचे या आदेशात म्हटले आहे. मात्र त्यासाठी काही कठोर निर्बंधही घालण्यात आले आहे. त्यानुसार, विद्यार्थिनींचे माप हे महिला कारागिराकडूनच घेतले जावे, तिचे माप घेताना शाळा व्यवस्थापन समितीमधील महिला सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित महिला यांना उपस्थित ठेवण्याचे आदेश आहेत.

यंदा ज्याचा ड्रेस त्यालाच!शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गणवेश शिवायला टाकताना दरवर्षी एका जाड्याजुड्या विद्यार्थ्याचे माप घेतले जाते अन् सर्वांसाठी त्याच मापाचे ड्रेस शिवून आणले जातात. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना ढगळ शर्ट, काहींना आखूड पँट असे चित्र शाळांमध्ये पाहायला मिळते. मात्र यंदा शिक्षण परिषदेने प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वतंत्र माप घेण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येकाचे माप घेतानाचा फोटो काढून ठेवावा लागणार आहे. तर मुलींसाठी त्यांच्या आवडीप्रमाणे सलवार, स्कर्ट, ब्लाउज, पिनो, कमिज, ओढणी अशा पद्धतीचा गणवेश द्यावा लागणार आहे. त्यानुसारच मापे घ्यावी लागणार आहेत.

टॅग्स :Schoolशाळा