शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पायलची तक्रार टाळणाऱ्या वरिष्ठांवरही कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 21:13 IST

मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये जातीय छळातून डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या केली. यात तीन महिला डॉक्टरांंना अटक झाली असली तरी छळाबाबत डॉ. पायलने केलेल्या तक्रारीची दखल न घेणाºया रुग्णालयीन वरिष्ठांवरही कडक कारवाई करावी, अशी मागणी अनुसूचित जमाती कल्याण समितीचे प्रमुख आमदार डॉ. अशोक उईके यांनी केली आहे.

ठळक मुद्देआमदार अशोक उईके : अनुसूचित जमाती कल्याण समितीकडून मुंबईत आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये जातीय छळातून डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या केली. यात तीन महिला डॉक्टरांंना अटक झाली असली तरी छळाबाबत डॉ. पायलने केलेल्या तक्रारीची दखल न घेणाºया रुग्णालयीन वरिष्ठांवरही कडक कारवाई करावी, अशी मागणी अनुसूचित जमाती कल्याण समितीचे प्रमुख आमदार डॉ. अशोक उईके यांनी केली आहे.आमदार डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्वाखालील अनुसूचित जमाती कल्याण समितीने गुरुवारी नायर हॉस्पिटलला भेट दिली. डॉ. उईके यांच्यासह समिती सदस्य आमदार डॉ. देवराव होळी, आमदार डॉ. संजय पुराम यांनी अधिष्ठातांकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी आमदार ऊईके यांनी हॉस्पिटलच्या कामकाजासंदर्भात तीव्र नापसंती व्यक्त केली. डॉ. पायल तडवी यांचा केवळ आदिवासी असल्यामुळे छळ करण्यात आला. याबाबत त्यांनी वरिष्ठांकडे वारंवार तक्रार करूनही न्याय मिळाला नाही. त्यामुळेच कंटाळून पायलने आत्महत्या केली. या संदर्भात आदिवासी समाजात तीव्र प्रक्रिया उमटत आहे. रुग्णालयातील सर्व संबंधितांनी पायलच्या प्रकरणात टाळाटाळ केली आहे. त्यामुळे चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी समितीने केली. त्यानंतर मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचीही भेट घेऊन हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी करण्यात आली.सर्व दोषींवर कारवाई होणारसमितीच्या बैठकीनंतर अधिष्ठातांनी या प्रकरणातील कारवाईचा अहवाल आमदार डॉ. अशोक उईके यांना सोपविला. त्यानुसार रुग्णालयाचे युनिट प्रमुख डॉ. चिंग लिंग यी, खाते प्रमुख डॉ. स्नेहा शिरोडकर यांच्यावर २३ मे रोजीच कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली. शिवाय पाच सदस्यीय समिती गठित करुन चौकशी सुरू करण्यात आली आहे. या समितीत अनुसूचित जमातीचा एक सदस्यही समाविष्ठ आहे. २५ मे रोजी अ‍ॅन्टी रॅगिंग समितीसमोर सर्व संबंधित प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे म्हणणे जाणून घेण्यात आले. डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे यांच्यावर गुन्हा दाखल होताच २७ मेपासून त्यांना निलंबित करण्यात आले. आता डॉ. चिंग लिंग यी यांच्याही निलंबनाचे आदेश देण्यात आले आहे. पोलीस चौकशीअंती दोषी आढळणाºया सर्व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले.