शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनी गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करा; प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाची राज्यपालांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 18:52 IST

प्रजासत्ताक दिनी अनुपस्थित नगरपरिषद पदाधिकाऱ्यांना निलंबित करा.

यवतमाळ -   २६ जानेवारी प्रजासत्ताक दिवस साजरा करण्याकरीता देशातील पंतप्रधानांपासून तर सरपंच पदावरील लोकप्रतिनिधी, केंद्र व राज्य सरकार, शासकीय-निमशासकीय , सहकारी-सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थाचे पदाधिकारी-कर्मचारी व नागरिक व विध्यार्थी सर्वत्र गल्लीपासून तर दिल्ली पर्यंत गणतंत्र दिन उत्सव साजरा करण्यात व्यस्त असताना घाटंजी नगरपरिषद पदाधिकारी अध्यक्षा(प्रथम नागरीक), उपाध्यक्ष, सर्व सभापती व काही नगरसेवक मात्र MLC निवडणूकीचे घोडेबाजारात सहभागी होऊन जिवाची हौस भागविण्याकरिता पर्यटनाकरीता दौऱ्यावर गेले आहे. 

नगरपरिषद कार्यालय, आझाद मैदान, न. प. शाळेच्या झेंडा वंदन कार्यक्रमाकरीता  पदधिका-यांचीच उपस्थिती नव्हती, हा नागरिकांचा व देशाचा घोर अपमान आहे, देशाशी बेईमानी व गद्दारी आहे. तेव्हा या सर्व झेंडा वंदनास अनुपस्थित नगरपरिषद पदाधिकाऱ्यांना  निलंबित करावे अशी मागणी  राज्यपाल यांना घाटंजीच्या तहसीलदार पुजा माटोडे यांच्या मार्फत प्राऊटिस्ट ब्लॉक इंडिया चे विदर्भ संघटक मधुकर निस्ताने यांचे नेत्रुत्वात निवेदन देण्यात आले. 

घाटंजी नगरपरिषद पदाधिका-यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची  चौकसी उपविभागीय महसूल अधिकारी, केळापूर यांनी केली आहे, त्या चौकशीत विद्यमान अध्यक्षा व  उपाध्यक्ष दोषी ठरविण्यात आले आहे, कार्यवाही मात्र अद्याप झालेली नाही, याचा खेद वाटतो याबाबत गंभीर दखल घ्यावी, असेही निवेदनातून कळविण्यात आले आहे.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनYavatmalयवतमाळMaharashtraमहाराष्ट्र