शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नेर तालुक्यात पाण्यासाठी टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 22:17 IST

तालुक्यात आतापासूनच पाणीप्रश्न तापला आहे. अशातच पंचायत समितीने कृती आराखडा नाममात्र बनविल्याने पाणी समस्या अधिक गंभीर होणार असल्याची चिन्हे दिसत आहे.

ठळक मुद्दे३८ गावांना पाणीटंचाईच्या झळा : मंजूर कृतीआराखडा नाममात्र असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्यात आतापासूनच पाणीप्रश्न तापला आहे. अशातच पंचायत समितीने कृती आराखडा नाममात्र बनविल्याने पाणी समस्या अधिक गंभीर होणार असल्याची चिन्हे दिसत आहे. ३८ गावातील नागरिक आतापासूनच पाणी टंचाईच्या झळा सोसत आहे.मंजूर आराखड्यात उपाययोजनांचे टप्पेच अधिक पाडण्यात आलेले आहेत. विहीर अधिग्रहणात परजना, शहापूर, चिचगाव पिंपरी (ईजारा), पेंढारा याच गावांचा समावेश करण्यात आला. प्रत्यक्षात आंजती, मांगलादेवी, चिकणी डोमगा, पिंपळगाव काळे याशिवाय इतर गावात विहीर अधिग्रहणाची गरज आहे.टँकरने पाणीपुरवठ्यासाठी चिचगाव, पिंप्री इजारा, पेंढारा या गावांचा समावेश आहे. आजंती, चिकणी, मांगलादेवी यासह इतर २० गावे तहानलेली आहेत. तात्पुरती पुरक नळयोजनेत बाणगाव, बोंडगव्हान, मांगलादेवी, रत्नापूर, सिंदखेड, परजना गावांचा समावेश आहे. मुळात परजना येथे विहीर आहे. मात्र पाईपलाईन नसल्यावर तात्पुरती कोणती योजना प्रशासन करणार हा प्रश्न आहे. नळयोजना आहे, पण पाणी नाही अशी या गावाची अवस्था आहे.दरवर्षी नळयोजना विशेष दुरुस्तीच्या नावाने कृतीआराखडा तयार केला जातो. मात्र कायस्वरूपी दुरुस्ती कधी झाली नाही. हा निधी जातो कुठे हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. धनज, पिंपळगाव (डुब्बा), सोनखास, उत्तरवाढोणा, वटफळी या गावांचा समावेश विशेष दुरुस्तीमध्ये आहे. अनेकदा आराखडे तयार झाले, प्रत्यक्षात दुरुस्ती झालेली नाही.खासगी विहीर अधिग्रहणासाठी पिंपळगाव काळे, बोरगाव, चिकणी डोमगा, चिखली कान्होबा, दहीफळ, धनज, दोनद खुर्द, रामगाव, जवळगाव, सारंगपूर, कोव्हळा, बोदगव्हान, खरडगाव, मालखेड (बु), मालखेड (खुर्द), मंगरूळ, सांवगा, शेंद्री (खुर्द), शिरजगाव, उत्तरवाढोणा, वाई, पारस, वटफळी आदी गावांचा समावेश कृती आराखड्यात करण्यात आला. या गावात कायमस्वरूपी योजनांची गरज आहे. परंतु याकडे गांर्भियाने कुणीही लक्ष देताना दिसत नाही.भीषणता कमी दाखविण्याचा खटाटोपनेर तालुक्यात आतापासूनच पाणीप्रश्न भीषण झाला आहे. प्रशासनाकडून मात्र टप्प्या टप्प्याने उपायांची आखणी कृती आराखड्यात करण्यात आली आहे. भीषणता लपविण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचे बोलले जाते. एनवेळी केल्या जाणाºया उपाययोजना लोकांसाठी त्रासाच्या ठरणाºया आहेत. प्रत्यक्ष पाणीटंचाई असलेली गावेच कृती आराखड्यात नसल्याने ही शक्यता अधिक आहे.