शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सिंजेन्टा कंपनीविरोधात कीटकनाशक विषबाधितांचा स्विस कोर्टात खटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 18:24 IST

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबियांनी 'पोलो' या धोकादायक कीटकनाशकावर बंदी घालण्यासाठी आणि पीडित कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून सिंजेन्टा कंपनी विरोधात स्वित्झरलँड येथील बासेलच्या सिव्हिल कोर्टात खटला भरला आहे.

ठळक मुद्देभरपाईसाठी यवतमाळच्या शेतकऱ्यांनी दाखल केली याचिकापॅन इंडिया व एमएपीपीपीचा लढा सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबियांनी 'पोलो' या धोकादायक कीटकनाशकावर बंदी घालण्यासाठी आणि पीडित कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून सिंजेन्टा कंपनी विरोधात स्वित्झरलँड येथील बासेलच्या सिव्हिल कोर्टात खटला भरला आहे. या खटल्यात सिल्व्हियो रिसन, थिबाऊट मेयर हे युक्तिवाद करणार आहेत.खरीप-२०१७ च्या हंगामात राज्यातील हजारो कापूस उत्पादकांना कीटकनाशकाच्या फवारणीमुळे तीव्र विषबाधा होवून यांत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर कित्येकांना कायमचे अपंगत्व आले. याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा एमएपीपीपीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी या विषयाला वाचा फोडली होती. पॅन इंडियाचे संचालक डॉ.नरसिम्हा रेड्डी यांनी कायदेशीर लढाईसाठी पुढाकार घेतला आहे.सिंजेंन्टा कंपनीच्या पोलो या कीटकनाशकांमुळे तीव्र विषबाधा होत असल्याचे पॅन इंडिया व पब्लिक आय च्या सर्वेक्षणात आढळून आलेले आहे. मात्र या कंपनीने आरोग्य व आर्थिक नुकसानीबाबत आपली जबाबदारी स्पष्टपणे झटकली. पोलोमुळे विषबाधा झाल्याचा कोणताही पुरावा नाही असे म्हणत स्वित्झरलँडच्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीने यवतमाळ जिल्ह्यातील विषबाधा प्रकरणावर केलेल्या माहितीपटावरही त्यांनी अधिकृतपणे आक्षेप घेतला.महाराष्ट्र असोसिएशन ऑफ पेस्टीसाईड पॉईझन्ड पर्सनआणि पेस्टीसाईड एक्शन नेटवर्क (पॅन इंडिया) , एशिया पॅसेफिक (पॅन एपी) व स्विस वृत्तवाहिनीने या प्रकरणाची कागदपत्रे गोळा केली. तसेच पोलिसांनी सिजेंन्टाच्या कीटकनाशकसंबंधित ९६ प्रकरणाची नोंद केली आहे, त्यापैकी दोन प्रकरणात शेतक?्यांचा मृत्यू झाला असून एक शेतकरी अजूनही गंभीर आहे.पोलो या कीटकनाशकामध्ये डायफेनथुरोन हे घटक असून ते स्वित्झरलँड येथून आले. पोलोने विषबाधा झाल्यास त्यावर प्रतिरोधक औषध देखील नाही. या कंपनी कडून मानवी हक्काचे उल्लंघन झाले आहे, असा प्रकरणातील याचिकेत दावा करण्यात आला. सिंजेन्टा कंपनीने धोकादायक कीटकनाशक पोलो आणि ज्यामध्ये पीपीई किटची आवश्यकता आहे असे कीटकनाशक शेतकऱ्यांना विकू नये तसेच कंपनीने मृत्युमुखी पडलेल्या २, एक अति गंभीर व पीडित ५१ शेतकरी कुटुंबियांना नुकसान भरपाई व उपचार खर्च द्यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे असे एमएपीपीपी चे निमंत्रक देवानंद पवार यांनी सांगितले आहे.पोलो या कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर ५१ पैकी ४४ जनांना गंभीर दुखापत झाली. त्यापैकी बहुतेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींना तात्पुरते आंधळेपणा आले होते. १६ जन तर अनेक दिवस बेशुद्ध होते. काहींना मज्जातंतू आणि मांसपेशीचा त्रास होत आहे, परिणाम त्यांच्याकडे रोजगाराचे कोणतेही साधन नाही.विषबाधा प्रकरण हे मानवी हक्कांचे उल्लंघन असून याविरोधात न्यायालयीन लढा चालू ठेवणार असल्याचे प्रतिपादन देवानंद पवार व डॉ नरसिम्हा रेड्डी यांनी केले आहे. भारतातील अशा प्रकारच्या प्रकरणात परदेशात खटला चालविण्याची हि पहिलीच वेळ आहे.

टॅग्स :Courtन्यायालयagricultureशेती