लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सहकार विभागाला २४ तासांत शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे वळते करण्याच्या सूचना आहेत. त्याकरिता रविवारी याद्या तपासण्याचे काम गटसचिवांना देण्यात आले. मात्र या यादीतच अनेक घोडचूका असल्याने यादी तपासणीत जिल्हाभर प्रचंड गोंधळ उडाला.जिल्हा बँकेच्या ४१ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. मात्र त्यांच्या आॅनलाईन यादीतच अनेक गंभर चुका आहेत. त्यामुळे सहकार विभागाने ही यादी दुरूस्तीसाठी आयटी विभागाकडे पाठविली. दुरूस्त झालेली यादी मात्र रविवारी सायंकाळपर्यंत गटसचिवांना मिळाली नाही. परिणामी त्यांची यादी तपासणीच रखडली. महिनाभरापूर्वी कर्जमाफीची घोषणा होऊनही एक छदामही जिल्ह्याला मिळाला नाही. आता हिवाळी अधिवेशनात सरकारला विरोधकांना तोंड द्यायचे आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या ४१ हजार शेतकºयांच्या खात्यात २१७ कोटी जमा करण्याच्या सूचना आहेत.या सूचनेनुसार येथील सहकार विभाग आणि बँकांनी रविवारी तातडीची बैठक घेतली. त्यात गटसचिवांना याद्या तपासणीच्या कामासाठी पाचारण करण्यात आले. रविवारी सकाळी ८ वाजतापासूनच गटसचिवांनी यादी तपासणीकरिता तालुकास्थळी हजेरी लावली. आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध यादी दुरूस्तीचे काम गटसचिवांनी हाती घेतले. मात्र या यादीत एकच नाव दोन ते तिनदा असल्याचे आढळून आले. कर्जाच्या रकमेतही तफावत होती. खाते क्रमांकातही गोंधळ होता. यामुळे उपलब्ध याद्या पुन्हा दुरूस्तीसाठी आयटी विभागाला पाठविण्यात आल्या. या याद्या तासभरात नव्याने मिळतील, असे त्यांना सांगण्यात आले. प्रत्यक्षात रविवरी सायंकाळी ६ वाजतापर्यंत गटसचिवांना सुधारित यादी मिळाली नाही. यामुळे जिल्हाभर गटसचिवांचा गोंधळ उडाला.या यादी तपासणीमुळे गटसचिव वैतागले होते.सहकार विभागाची यंत्रणा दक्षकर्जमाफीचे काम युद्धपातळीवर पार पाडण्यासाठी तालुका पातळीवर रविवारी गटसचिवांना बोलावले गेले. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहकार विभागाची यंत्रणा होती. प्रत्यक्षात आयटी विभागाने सुधारित याद्या पाठविल्या नाही. गटसचिव सहाय्यक निबंधक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याद्या कधी येणार म्हणून वारंवार विचारत होते. मात्र त्यांना रात्र झाली तरी तुम्हाला येथेच थांबावे लागेल, याद्या क्लिअर केल्यानंतरच पुढे जाता येईल, असे सांगितले जात होते. यामुळे गटसचिव चांगलेच वैतागले होते.
कर्जमाफीच्या यादीत घोडचुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:17 IST
सहकार विभागाला २४ तासांत शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे वळते करण्याच्या सूचना आहेत. त्याकरिता रविवारी याद्या तपासण्याचे काम गटसचिवांना देण्यात आले.
कर्जमाफीच्या यादीत घोडचुका
ठळक मुद्दे४१ हजार शेतकरी : रविवारी याद्या तपासताना गटसचिव वैतागले