शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

‘सुत्त पिटकात’ आढळतात स्त्री स्वातंत्र्याची बिजे

By admin | Updated: January 30, 2016 02:46 IST

थेरी गाथा बुद्धाच्या काळातील अनन्य साधारण व मौल्यवान असा ग्रंथ आहे. त्रिपिटकातील तिसरा भाग म्हणजे सुत्तपिटक या थेरी गाथा प्रकरणात स्त्रीमुक्तीवादी वैचारिकतेची सशक्त बिजे आढळतात.

रूपेश कऱ्हाडे : प्रबोधन मंडळाच्यावतीने व्याख्यानदिग्रस : थेरी गाथा बुद्धाच्या काळातील अनन्य साधारण व मौल्यवान असा ग्रंथ आहे. त्रिपिटकातील तिसरा भाग म्हणजे सुत्तपिटक या थेरी गाथा प्रकरणात स्त्रीमुक्तीवादी वैचारिकतेची सशक्त बिजे आढळतात. १८ व्या शतकामध्ये पाश्चात्य विचारवंतांनी या ग्रंथातील स्त्री स्वातंत्र्यवादी विचारांवर प्रकाश टाकला. तेव्हापासून या ग्रंथातील थेरी म्हणजे अडीच हजार वर्षापूर्वीच्या शौर्यवान बुद्धीवान स्त्रिया होय, असे प्रतिपादन प्रा. डॉ. रुपेश कऱ्हाडे यांनी येथे केले. स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंडळाच्यावतीने आयोजित ‘थेरी गाथा’ या विषयावरील व्याख्यानात ते शुक्रवारी बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका रुपा मानकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मधुकर वाघमारे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष देविदास खंडारे, डॉ. आंबेडकर प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष डॉ. उत्तम राऊत उपस्थित होते. प्रा.डॉ. कऱ्हाडे म्हणाले, प्रोफेसर आर.पिशेल या जर्मन विचारवंताने प्रथम थेरी गाथा प्रकाशात आणल्या. त्यानंतर ऱ्हीस डेव्हीड्स यांनी इंग्रजी अनुवाद केला. पुढे १८९९ मध्ये कॅथरीन ब्लेकस्टोन व १८९८ मध्ये मीना तालीम यांनी या ग्रंथाला प्रसिद्धी मिळवून देत भारतात प्रकाशित केला. त्यानंतर बुद्धकन्यांच्या मुक्तीगाथा थेरीगाथा हा ग्रंथ डॉ. रुपा कुळकर्णी-बोधी यांनी लिहून मराठीत प्रकाशित केला. या प्रकाराने भारतातील गाथा पाश्चिमात्य देशातून परत भारतापर्यंत या थेरीग्रंथाद्वारे पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. थेरीगाथांमध्ये स्त्री मुक्तीची बिजे सापडतात. यातील किसा गौतमी, मुक्त खेमा, आम्रपाली, पटाचारा, सोमाथेरी या सारख्या ७३ थेरीच्या ५२२ गाथा व १६ संग्रह प्रकाशित आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला तुकाराम उबाळे, विनायक देवतळे, कुसुमताई जांगडे, उद्धव अंबुरे, महादेव धुळध्वज, चिंतामण मनवर, प्रदीप नगराळे, किसन हस्ते, यशवंत भरणे, पुरुषोत्तम मेश्राम, शामराव खाडे, बुद्धीवंता खाडे, प्रा.नंदू वानखडे, लता भरणे, ताई रंगारी, गुंजन कऱ्हाडे, विवेक सरदार, गोल्डी कऱ्हाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)