शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शंकेखोर प्रियकराने केला प्रेयसीचा घात; २४ तासात हुडकून ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2023 19:34 IST

Yawatmal News प्रेयसीने प्रेमात धोका दिला, या भावनेने संतप्त झालेल्या शंकेखोर प्रियकरानेच त्याच्या प्रेयसीचा खून केल्याची बाब तपासात उघड झाली आहे.

यवतमाळ : प्रेयसीने प्रेमात धोका दिला, या भावनेने संतप्त झालेल्या शंकेखोर प्रियकरानेच त्याच्या प्रेयसीचा खून केल्याची बाब तपासात उघड झाली आहे. वणी शहरातील जैन ले-आउट परिसरात सोमवारी सकाळी या तरुणीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता. वणी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून या प्रकरणाच्या तपासाला गती दिली आणि २४ तासांच्या आत हिंगोली जिल्ह्यातील शिरोळी (ता. वसमत) येथे जाऊन आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या.

विनोद रंगराव शितोळे (२५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मृत प्रिया रेवानंद बागेसर ऊर्फ आरोही वानखेडे (२५) ही मूळची वरोरा येथील रहिवासी आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ती वणीतील जैन ले-आउटमधील कृष्णा अपार्टमेन्टमधील पहिल्या माळ्यावरील एका फ्लॅटमध्ये किरायाने राहत होती. सोमवारी सकाळी या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती फ्लॅटचे मालक राकेश डुबे यांनी पोलिसांना दिली. पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यावेळी फ्लॅटच्या दाराचा कोंडा बाहेरून लावून होता. दार उघडून आत बघितले असता, प्रियाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत जमिनीवर पडून होता. तिच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा होत्या. हा खूनच असल्याची शंका पोलिसांना आल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला.

केवळ नावावरून लावला आरोपीचा छडावणी पोलिसांना तपासात समजले की, विनोद नामक तरुणाशी प्रियाचे प्रेमसंबंध होते. खून करून तो गावाकडे पसार झाला. संशयित आरोपीचे नावही माहीत नसताना वणीचे ठाणेदार प्रदीप सिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक माधव शिंदे, त्यांचे सहकारी अमोल अन्नेवार, सागर सिडाम यांनी बुद्धिकौशल्याचा वापर करीत आरोपी प्रियकर विनोद शितोळे याला हिंगोली जिल्ह्यातील शिरोळी गावातून अटक केली. त्याने पोलिसांपुढे गुन्ह्याची कबुली दिली आहे.

फेसबुकवरून फुलले प्रेम

मृत प्रिया व विनोद या दोघांची मैत्री फेसबुकवर झाली. कालांतराने मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तो तिला भेटण्यासाठी नेहमीच वणीत येत असे. विनोद स्वभावाने शंकेखोर होता. प्रियाचे अन्य कुणाशी प्रेमसंबंध असल्याची त्याला शंका होती. घटनेच्या दिवशी याच मुद्द्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात विनोदने प्रियाचा खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. तिचा खून करण्यासाठी नेमके कोणते हत्यार वापरले, हे मात्र तपासाचा भाग असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी