शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

दलित वस्ती निधीतील अडीच कोटींच्या कामांना स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:30 IST

नगरपरिषदेने शहरात नागरी दलित वस्ती सुधार योजनेच्या सहा कोटी ५० लाखांच्या निधीतून २०१६ मध्ये विविध कामे प्रस्तावित केली. यातील बहुतांश कामे दलित वस्तीबाहेर मंजूर करण्यात आली होती. या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली.

ठळक मुद्देयवतमाळ नगरपरिषद : नियमांचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेने शहरात नागरी दलित वस्ती सुधार योजनेच्या सहा कोटी ५० लाखांच्या निधीतून २०१६ मध्ये विविध कामे प्रस्तावित केली. यातील बहुतांश कामे दलित वस्तीबाहेर मंजूर करण्यात आली होती. या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली. कामाचे मूल्यांकन केल्यानंतर ही कामे दलित वस्तीबाहेर असल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब करत दोन कोटी ६० लाखांची कामे तत्काळ थांबविण्याचा आदेश मंगळवारी पारित केला.शहरात दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीतून रस्ता रुंदीकरण, फूटपाथ ही कामे मंजूर करून या कामांना सुरुवात केली. यामध्ये दलित वस्तीबाहेरच्या कामांचा मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आला. ही बाब नगरपरिषदेच्या लक्षात आणून दिल्यानंतरही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. अखेर नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष आनंद गायकवाड यांनी दलित वस्तीचा निधी इतरत्र खर्च होत असल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली. तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी ही कामे खरेच दलित वस्ती क्षेत्रात होते का, याचे फेरमूल्यांकन करण्याचे आदेश सहायक समाजकल्याण आयुक्तांना दिले. या फेरमूल्यांकनामध्ये दोन कोटी ६० लाख पाच हजार रुपयांची कामे दलित वस्ती क्षेत्राबाहेर असल्याचे आढळून आले. यामध्ये सुलभेवार मार्केटपासून माळीपुरा पुलापर्यंत रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण तसेच अ‍ॅड.मनक्षे ते झेंडा चौकापर्यंत रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण, नाली बांधकाम, रामरहीमनगर रस्ता बांधकाम दलित वस्ती क्षेत्राबाहेर होत असल्याचा अहवाल दिला. त्यानंतर हे प्रकरण जिल्हाधिकाºयांपुढे सुरू होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दलित वस्ती निधी खर्च करण्यासाठी ५ मार्च २००२ च्या शासन निर्णयात जे निकष घालून दिले आहेत त्याचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट केले. या खटल्यात याचिकाकर्त्याच्या बाजूने अ‍ॅड.जयसिंह चव्हाण यांनी बाजू मांडली.शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन करून नागरी दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीअंतर्गत कुठलेही काम करता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आता ही कामे थांबविण्याशिवाय नगरपरिषदेपुढे कुठलाही पर्याय नाही.खर्च वसूल करण्यासाठी करणार अपीलदलित वस्तीचा निधी खर्च करण्याबाबत स्पष्ट निर्देश असताना चुकीचा ठराव घेऊन मनमानीपणे पैसा खर्च केला. याची जबाबदारी निश्चित करून हा खर्च वसूल करण्यासाठी अपील करणार असल्याचे आनंद गायकवाड यांनी सांगितले.