शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

वनोजादेवी येथील सुरेशची अपंगत्वावर मात

By admin | Updated: August 23, 2014 02:12 IST

येथून सहा किलोमीटर अंतरावरील मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी येथील अपंग सुरेशने जिद्दीने आपल्या अपंगत्वार मात करून जीवन जगण्याची कला हस्तगत केली आहे.

गणेश रांगणकर नांदेपेरायेथून सहा किलोमीटर अंतरावरील मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी येथील अपंग सुरेशने जिद्दीने आपल्या अपंगत्वार मात करून जीवन जगण्याची कला हस्तगत केली आहे. आपल्या अपंगपणाचा कुठेही ढिंढोरा न पिटता त्याने स्वत:च्या पायावर उभे राहून आपला उदरनिर्वाहाचा मार्ग शोधला आहे. वनोजादेवी या गावात अत्यंत गरीब परिस्थितीतील गाडगे कुटुंबात सुरेशचा जन्म झाला. तानबाजी गाडगे त्याचे वडील. त्याला आई-वडिलांसह एक भाऊ, एक बहीण आहे. जन्मताच सुरेश दोन्ही पायांनी अपंग होता. मात्र अपंग असूनही त्याने गावातील शाळेत सातवीपर्यंत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. मात्र नंतर गावात माध्यमिक शाळा नव्हती. गावापासून जवळपास सहा किलोमीटर अंतरावर नांदेपेरा येथे माध्यमिक शाळा होती़ तथापि सुरेश अपंग असल्याने त्याला नांदेपेरा येथील शाळेत दररोज कसे पोहोचावे, असा प्रश्न पालकांपुढे पडला. सुरेशला पुढील माध्यमिक शिक्षण मिळते किंवा नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. वडील पेचात सापडले. मात्र अपंग सुरेशची शिकण्याची जिद्द व चिकाटी वाखाणण्याजोगी होती. कोणतयाही स्थितीत पुढील शिक्षण घ्यायचेच, असा चंगच त्याने बांधला होता. त्यामुळे शेवटी त्याच्या वडिलांनी त्याला नांदेपेरा येथील पंचशील हायस्कूलमध्ये आठवीत दाखल केले़ मात्र सुरेशचा शाळेत जाण्यााच प्रश्न कायमच होता. या स्थितीत त्याचे काही मित्र समोर आले. ते दररोज त्याला वनोािदेवी येथून आपल्या सायकलवर मागे बसवून शाळेत नेऊ लागले. शिक्षणाच्या जिद्दीने आणि मित्रांच्या सहकार्याने अखेर सुरेशने तेथे दहावीपर्यंत आपले शिक्षण पूर्ण केले़ परंतु दररोज मित्रांच्या सायकलवर मागे बसून येताना, त्याचे विचारचक्र सुरू असे. सायकल कशी तयार झाली असेल, चाके कशी फिरत असतील, आदी प्रश्न त्याच्या मनात घर करून होते. त्यामुळेच मित्राच्या सायकलला पंक्चर किंवा इतर बिघाड झाल्यास सुरेश तो दुरूस्त करण्याचा प्रयत्न करीत होता़ याच प्रयत्नातून त्याने मनात खूणगाठ बांधली. दहावीनंतर त्याचे शिक्षण रखडले अन् त्याने आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी गावातच मिळेल तेथे सायकल पंक्चर दुरूस्तीचे काम सुरू केले. प्रथम त्याला नीट काम येत नव्हते. प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर त्याने पूर्ण काम शिकून घेतले. गावात कुठेही तो पंक्चर दुरुस्ती करायचा. गरीब परिस्थितीमुळे त्याला दुकान लावणे अशक्य होते. दरम्यान वणीतील विनोद मुत्यलवार यांनी त्याला सायकल दुरूस्ती करताना बघितले़ अपंग सुरेशची जिद्द, चिकाटी, काम करण्याची कला बघून ते अचंबित झाले. त्यांनी सुरेशला आपल्या वणी येथील दुकानात काम करतो का ?, अशी विचारणा केली. तेव्हा सुरेशचा आनंद गगनात मावेनासा झाला. ग्रामीण भागापेक्षा शहरात जादा प्रमाणात काम मिळत असल्याने सुरेशने अखेर वणीत दुरूस्तीचे काम सुरू केले़ आज सुरेश जवळपास ३८ वर्षांचा आहे. वयाच्या अठराव्या वर्षांपासून तो मुत्यलवार यांच्या दुकानात वणीत सायकल दुरूस्तीचे काम करीत आहे. या कामातून त्याला दरमहा तीन-चार हजार रूपये मिळतात. त्यात स्वत:च्या उदरनिर्वाहा सोबतच तो कुटुंबालाही मदत करीत आहे़ सुरेश दररोज वनोजादेवी येथून आॅटोने वणीला जातो. वणीच्या बसस्थानकपासून दुकानापर्यंत सायकलने जातो, अशी त्याची दिनचर्या आहे़ सध्याच्या काळात सुशिक्षित बेरोजगार सतत नोकरीच्या शोधात भटकताना दिसतात. मात्र त्यांना छोटे-मोठे काम करण्याची इच्छा होत नाही. सुरेशने मात्र आपल्या अपंगत्वाचा बहाणा न करता बेरोजगारांना लाजवेल, अशी कामगिरी करून जीवन जगण्याचा पर्याय शोधला आहे़ शासनाकडून उद्योग, व्यवसायासाठी कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही, असे तो सांगतो. शासनाकडून मदत मिळाल्यास आणखी काही तरी मोठा व्यवसाय सुरू करावा, अशी त्याची मनीषा आहे. तूर्तास त्याच्या जिद्द आणि चिकाटीला मात्र कुठेच तोड नाही.