शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

रणरणत्या उन्हात फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना सनस्ट्रोकचा धोका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 22:04 IST

राजकारण तापले आहे. पण त्याहीपेक्षा सूर्य जास्त तापला आहे. भरउन्हात गावोगावी प्रचाराला फिरणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांवर सूर्य कोपला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींची आणि उमेदवारांची काळजी घेताना कार्यकर्त्यांनी स्वत:चीही काळजी घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्देराजकारण तापले अन् सूर्याचा पाराही भडकलाय : डॉक्टर म्हणतात, निवडणुकीतील विजयापेक्षा जीव वाचणे महत्त्वाचे, पाणी भरपूर प्या, दारू-कोल्ड्रींक टाळा

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राजकारण तापले आहे. पण त्याहीपेक्षा सूर्य जास्त तापला आहे. भरउन्हात गावोगावी प्रचाराला फिरणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांवर सूर्य कोपला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींची आणि उमेदवारांची काळजी घेताना कार्यकर्त्यांनी स्वत:चीही काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा सूर्याचा कोप होऊन तुम्हाला उष्माघाताचा (सनस्ट्रोक) दणका मिळण्याची शक्यता आहे.यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे मतदान पहिल्याच टप्प्यात ११ एप्रिलला असल्याने प्रचाराला अत्यंत कमी दिवस मिळाले आहे. त्यामुळे उन्हाची पर्वा न करता कार्यकर्ते गावोगावी प्रचाराला फिरत आहेत. पण कोणताही विजय जीवापेक्षा मोठा नसतो.दिवसभर उन्हात फिरूनही तग धरायची असेल, तर कार्यकर्त्यांनी भरपूर पाणी प्यावे, असा सल्ला यवतमाळातील डॉक्टरांनी दिला आहे. शिवाय, शरीरातील ग्लूकोज टिकवायचे असेल तर दारू आणि कोल्ड्रींक टाळण्याची गरज आहे. एसी गाडीतून फिरतानाही जीव जपण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.दुपारी १२ ते ५ या वेळात घराबाहेर पडू नकासध्या तापमान प्रचंड आहे. अशावेळी कार्यकर्त्यांनी प्रचाराला बाहेर पडताना खूप काळजी घेतली पाहिजे. ज्यांना बीपी, हार्टअटॅक, डायबिटीज या तक्रारी आहेत, त्यांनी तर दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळात घराबाहेर पडूच नये. पण प्रचाराला कमी दिवस असल्याने राजकीय कार्यकर्ते ऐकणार नाही. त्यामुळे त्यांनी किमान तब्येतीची काळजी घेऊनच फिरावे. सोबत भरपूर पाणी ठेवावे. तहान लागो वा न लागो, दर तासाला अर्धी बॉटल पाणी पित राहावे.- डॉ. विजय ठाकरे, यवतमाळपुढच्या आठवड्यातही उष्णतेची लाटसध्याची शहरे हिट लॅण्ड झाली आहेत. अवकाशातून शहरांचे अवलोकन केले तर संपूर्ण शहर लालबुंद दिसते. यालाच हिट लॅण्ड म्हटले जाते. पुढील आठवडाभर उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यामुळे प्रचाराला फिरणाऱ्या कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी. राजकीय प्रचार करताना स्वत:च्या जीवाची काळजी कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. मात्र पर्यावरणाबाबत कुठल्याही राजकीय पक्षांना सवड नाही. खरे तर पर्यावरणासाठी गांभीर्याने काम करण्याची गरज आहे.- सुरेश चोपणे, हवामान अभ्यासकहे करालतर वाचाल?1. उन्हात प्रचाराला फिरणाऱ्यांना सनस्ट्रोक होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.2. पहाटे प्रचाराला सुरुवात करा. दुपारी १२ पर्यंत सावलीत परत या. हवे तर दुपारी ४ नंतर रात्री उशिरापर्यंत फिरा.3. कोल्ड्रींक, दारू टाळा. माठातील पाण्याच्या बॉटल सोबत ठेवा. बॉटलमध्ये एक चमचा मीठ टाकून पित राहा.4. ताक, लिंबू व मीठ टाकलेले पाणी, नारळपाणी घेतल्यास उष्माघात टळू शकेल.

टॅग्स :TemperatureतापमानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक