पुसद : येथील एका औषध विक्रेत्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. राघेवेंद्र दीपक चिन्नावार (२५) रा. डुब्बेवार ले-आऊट पुसद असे मृताचे नाव आहे. राघेवेंद्र याचे येथील डांगे हॉस्पिटलमध्ये स्वत:चे मेडिकल स्टोअर्स आहे. शुक्रवारी त्याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सायंकाळी ७.३० वाजता ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी सचिन सुभाष तगडपल्लेवार यांनी पुसद शहर पोलिसांना घटनेची सूचना दिली. राघेवेंद्रच्या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. तो कुटुंबात एकुलता एक होता. त्याच्या पश्चात आई, दोन बहिणी असा परिवार आहे. त्याच्या आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)
औषध विक्रेत्याची पुसदला गळफास लावून आत्महत्या
By admin | Updated: March 1, 2015 02:04 IST