शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
5
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
6
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
7
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
8
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
9
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
10
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
11
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
12
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
13
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
14
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
15
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
16
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
17
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
18
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
19
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 

‘वसंत’साठी ऊस उत्पादकांचे रणशिंग

By admin | Updated: September 27, 2015 02:01 IST

विदर्भात सहकारी तत्वावर सुरू असलेल्या एकमेव वसंत साखर कारखान्यासाठी सर्व पक्षाचे नेते एकवटले आहे.

पक्षभेद विसरून नेते एकवटले : हजारो शेतकऱ्यांची मेळाव्यामध्ये उपस्थितीउमरखेड : विदर्भात सहकारी तत्वावर सुरू असलेल्या एकमेव वसंत साखर कारखान्यासाठी सर्व पक्षाचे नेते एकवटले आहे. तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही कारखान्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी रणशिंग फुंकले आहे. या एकीच्या भावनेचे दर्शन शनिवारी झालेल्या मेळाव्यात घडले. हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेल्या ऊस उत्पादकांनी कारखाना प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला. यावर्षीचा गळीत हंगाम सुरू व्हावा यासाठी संचालक मंडळाकडून कुठलाही पाठपुरावा केला जात नाही. म्हणून ऊस उत्पादक सभासद संघाने पोफाळी येथील कारखाना साईडवर मेळावा घेतला. मेळाव्याचे अध्यक्ष माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर होते. आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार उत्तमराव इंगळे, तातू देशमुख, राम देवसरकर, पंजाबराव खडकेकर, संदीप हिंगमिरे, साहेबराव कदम, बाळासाहेब चंद्रे यांच्यासोबत सर्वच पक्षांचे नेते उपस्थित होते. वसंत साखर कारखाना जिवंत राहिला पाहिजे यासाठी कुठलीही किंमत मोजायला तयार आहे, असे मत अनेकांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. आमदार नजरधने यांनी सांगितले की, ११ महिन्यांपासून पगार नाही, पगारासह इतर कामगारांना कारखान्याकडून जवळपास पाच कोटी येणे आहे. ऊस उत्पादक सभासदांना ऊसाचा भाव फरक ३०० रुपये प्रती टन याप्रमाणे सहा कोटी ५० लाख, ऊस तोडणी ठेकेदार व वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रक यांना दोन कोटी, कामगारांचा प्रॉव्हिडंड फंड एक कोटी, साखरेचे पोते तारणावर घेतलेले ३५ कोटी, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पूर्व हंगामासाठी घेतलेले सात कोटी असे एकंदर ६० कोटी देणे आहे. एवढे कर्ज विद्यमान अध्यक्ष व संचालक मंडळाने कारखान्यावर करून ठेवले आहे. तरीही कारखाना सुरू व्हावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार आहे. राम देवसरकर यांनी विद्यमान अध्यक्ष व संचालक मंडळाने कारखाना डबघाईस आणल्याचा आरोप केला. कारखान्याच्या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचे ते म्हणाले. माजी आमदार उत्तमराव इंगळे, तातू देशमुख, भीमराव चंद्रवंशी, पंजाबराव खडकेकर, डॉ. गणेश घोडेकर आदींनीही विचार मांडले. कारखाना चालू करण्यासाठी उपस्थितांपुढे सूचना मांडल्या. गेल्या ४५ वर्षात प्रथमच वसंत कारखान्यापुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अगोदरच तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण मोठे आहे. उमरखेड, महागाव, पुसद, हदगाव, हिमायतनगर या पाच तालुक्यातील १८ हजार ऊस उत्पादक सभासद आहेत. त्यांच्याकडे एकूण सहा लाख मे.टन ऊस उभा आहे. शेतामध्ये तो गाळपासाठी वसंत कारखान्याला दिला जातो. यावर्षी जर कारखाना बंद पडला तर ऊस उत्पादकांना आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे सर्व सभासदांनी एकत्र राहून कारखाना टिकविण्यासाठी सहकार्य करण्याचे भावनिक आवाहन माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष राजू जयस्वाल, डॉ. विठ्ठलराव चव्हाण, जगदीश नरवाडे, कल्याणराव माने, रमेश चव्हाण, चितांगराव कदम, अ‍ॅड़ माधवराव माने, देवराव दिवसे, अनंतराव चिकने, किशोर ठाकुर, रामराव गायकवाड, डॉ. धोंडेराव बोरूळकर, नितीन भुतडा, नागोराव कदम, बालाजी वानखेडे, विलास चव्हाण, डॉ. अनिल कनवाळे, शामराव सुरोशे, उत्तमराव राठोड, कामगार नेते पी.के. मुडे यांच्यासह सर्वच पक्षातील नेते मंडळी उपस्थित होती. (शहर प्रतिनिधी)