शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

पुसद तालुक्यातील नागरिक खोकल्याने बेजार

By admin | Updated: July 24, 2016 00:46 IST

अति पावसामुळे आणि वातावरणातील बदलामुळे तालुक्यातील नागरिक खोकल्याने बेजार झाले आहेत.

वातावरण बदल : पावसामुळे रूग्णालयांत वाढली प्रचंड गर्दी पुसद : अति पावसामुळे आणि वातावरणातील बदलामुळे तालुक्यातील नागरिक खोकल्याने बेजार झाले आहेत. घरगुती उपचार करूनही आराम मिळत असल्याने अनेक नागरिक रूग्णालयाकडे धाव घेत आहे. त्यामुळे शहरातील रूग्णालये हाउसफुल्ल दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण, वातावरणातील चढउतर, अति पावसामुळे तालुक्यातील नागरिकांना सर्दी, पडसा, खोकला, तापाचे आजार बळावत आहेत. अनेकांना घशाचा आजार वाढत आहे. थंडी वाजून ताप येण्याचे प्रमाणही गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढले आहे. यावर नागरिक प्रथम घरगुती उपचार करतात. त्यातून आराम मिळाल्यास ते रूग्णालयाची वाट धरत नाही. मात्र आराम न मिळाल्यास त्यांना अखेर रूग्णालयाची वाट धरावीच लागते. वातावरणातील बदल आणि सततच्या पावसामुळे संसर्गजन्य विषाणूंची वाढ होण्यास मदत मिळते. सध्याचे वातावरण विषाणूंची वाढ होण्यास अत्यंत पोषक ठरत आहे. त्यामुळे पाण्यातून होणाऱ्या आजारांतही सतत वाढ होत आहे. यात शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणुंमुळे नागरिकांना सर्दी, पडसा, डोकेदुखी, ताप, खोकला, पाठदुखी, अंगदुखी, उलटी, अतिसार आदी आजार बळावत आहे. अशा रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी शहरातील शासकीय रूग्णालयासह खासगी रूग्णालयांतही गर्दी वाढू लागली आहे. या वातावरणाचा सर्वाधिक फटका चिमकुल्यांना बसत आहे. त्यामुळे पालक काळजीत सापडले आहेत. डॉक्टर मंडळी अशा वातावरणात विशेष काळजी घेण्याचे आवाहन करीत आहे. नागरकिांनी पाणी उकळून प्राशन करावे. पाण्यात निर्जंतुक औषधांचा वापर करावा, असे आवहन केले जात आहे. सोबतच नगरपरिषदेने शुद्ध पाणी पुरवठा करणेही गरजेचे आहे. नागरिकांनाकडून नगरपरिषद, जिल्हा परिषद, ग्रामंपचायतींनी याबाबत दक्षता घेण्याची मागणी होत आहे. सध्या पावसामुळे नदी, नाल्यांना गढूळ पाणी येत आहे. तेच पाणी नागरिकांना पुरविले जात आहे. प्रथम हे पाणी शुद्ध करणे आवश्यक आहे. मात्र ग्रामीण भागात अनेक ठिकाणी साधे ब्लिचींग पावडरही पाण्यात टाकले जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. शहरातही काही प्रमाणात हीच परिस्थिती आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी) पाऊस, उन्हाचा लपाछपीचा खेळ सुरूच गेल्या १५ दिवसांपासून पुसद तालुक्यात पाऊस आणि उन्हाचा लपाछपीचा खेळ सुरू आहे. हे वातावरण विषाणुंसाठी अत्यंत पोषक ठरत आहे. त्यांच्यासाठी हे वातावरण नंदनवनच ठरले आहे. तापमानात सतत चढउतार सुरू आहे. त्यामुळे हवेत बाष्प निर्माण झाले, तर विषाणुंची संख्या वाढते. त्यातून विषाणुंचा संसर्ग बळावण्याची शक्यताही तेवढीच वाढते. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज साथ रोगांचा प्रसार होऊ नये म्हणून नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. या काळात हलका आहार घ्यावा. तसेच फळे व भाजीपाल्यांचा आहारात समावेश करावा. जेवणात आंबट पदार्थांचा वापर टाळावा. उघड्यावरील पदार्थ खावू नये. पाणी उकळूनच प्राशन करावे. शती पदार्थांचा वापरही टाळावा. ही खबरदारी घेतल्यास आजारापासून बचाव होण्याची शक्यता असल्याचे अनेक डॉक्टरांनी सांगितले.