शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भीमा-कोरेगाव प्रकरणी बंद यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:10 IST

भीमा-कोरगाव प्रकरणी भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत बुधवारी वणीसह मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.

ठळक मुद्देतणावपूर्ण शांतता : वणी, मारेगाव, झरी व पांढरकवड्यातही घटनेचे पडसाद

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : भीमा-कोरगाव प्रकरणी भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत बुधवारी वणीसह मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात येऊन घटनेचा तिव्र निषेध नोंदविण्यात आला. तणावपूर्ण शांततेत हा बंद पार पडला. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता.१ जानेवारी रोजी भीमा-कोरेगाव आणि आजुबाजूच्या परिसरात नियोजित कट कारस्थान करून दंगली घडविणारे व त्यामागील सूत्रधारांना कडक शासन करण्यात यावे, या मागणीसाठी वणी शहरातील सर्व पुरोगामी व सामाजिक संघटनांच्यावतीने बुधवारी सकाळी ९ वाजता शहरात मोर्चा काढून बंदचे आवाहन करण्यात आले. शहरातील टिळक चौकातून काढण्यात आलेला हा मोर्चा खाती चौक, तुटी कमान चौक, टागोर चौक, गणेशपूर रोड, जलशुद्धीकरण केंद्र, महाराष्टÑ बँक चौक व तेथून चिखलगावजळील जिजाऊ चौकात पोहचला. तेथून हा मोर्चा परत फिरून शिवतिर्थ चौकात नेण्यात आला. तेथे सभा घेण्यात आली. या सभेत विविध संघटनांच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर दुपारी दोन वाजता सभेची सांगता झाली.यादरम्यान, वणी शहरात रुग्णालये, मेडिकल, बँका वगळता व्यापाºयांकडून कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सकाळपासूनच सुटी जाहीर करण्यात आली. सायंकाळनंतरही शहरातील अनेक प्रतिष्ठाने बंद होती. या मोर्चात भारिप-बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, बहुजन समाज पार्टी, संभाजी ब्रिगेड, पिरिपा, आदिवासी जनजागृती युवा संघटना, भाकप, माकप, भारतीय मुस्लिम परिषद, मराठा सेवा संघ यासह विविध पुरागोमी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते.मारेगावात उत्स्फूर्त प्रतिसादमारेगाव तालुक्यातील पुरोगामी विचारसरणीच्या विविध संघटनांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून रॅली काढण्यात आली. रॅलीद्वारे करण्यात आलेल्या बंदच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता व्यापाºयांनी कडकडीत बंद पाळला. शाळा-महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आलीत. या बंदचा प्रवासी वाहतुकीवरही परिणाम झाला. झरी येथेही विविध संघटनांच्यावतीने मोर्चा काढण्यात येऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.पांढरकवड्यात समिश्र प्रतिसादपांढरकवडा तालुक्यात बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील करंजी, मोहदा येथील बाजारपेठ १०० टक्के स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली. या ठिकाणी निषेध मोर्चा काढण्यात आला. पांढरकवडातील बाजारपेठ मात्र सुरळीत सुरू होती. पांढरकवडा येथील राष्टÑीय महामार्गावरील वाय पॉइंटजवळ संभाजी ब्रिगेड व भारत मुक्ती सेनेच्यावतीने दुपारी १ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला. परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.वणी व पांढरकवड्यातील बससेवाही ठप्पविविध संघटनांनी बंदची हाक दिल्याने बुधवारी सकाळी ९ वाजतानंतर वणी आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. सायंकाळी ५ वाजतानंतर मात्र बसेस सोडण्यात आल्या. बससेवा ठप्प झाल्याने वणी आगाराला अडीच लाख रुपयांचा फटका बसला. पांढरकवडा येथील

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव