शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

दारूबंदीसाठी ६७० ठराव सादर

By admin | Updated: June 17, 2015 02:11 IST

यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी जाहीर करावी, या मागणीसाठी मंगळवारी विविध पक्ष, संस्था व संघटनांनी एकत्र येवून ६७०

‘स्वामिनी’चा पुढाकार : घाटंजीत पक्ष, संस्था व संघटनांची एकजूट, आंदोलन अधिक तीव्र करणारघाटंजी : यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी जाहीर करावी, या मागणीसाठी मंगळवारी विविध पक्ष, संस्था व संघटनांनी एकत्र येवून ६७० ठराव येथील तहसीलदारांना सादर केले. ही मोहीम जिल्हाभर राबविली जाणार असून सुरुवात घाटंजीतून करण्यात आली. पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, चेंबर आॅफ कॉमर्स, वकील संघ, भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनकासे, शिक्षक संघटना, डॉक्टर्स असोसिएशन, गुरुदेव सेवा मंडळ, पत्रकार संघटना यासह तालुक्यातील ग्रामपंचायती, तंटामुक्त गाव समित्या, स्वयंसेवी संस्था, बचत गट, दुर्गोत्सव व गणेशोत्सव मंडळ, छत्रपती महोत्सव समिती, विविध समाज संघटना, महिला मंडळ आदींचे ठराव देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्त्व ‘स्वामिनी’ अभियानाचे संयोजक महेश पवार आणि घाटंजी तालुका संयोजक अमोल ढगले यांनी केले. ठराव मोहिमेमध्ये प्रामुख्याने पंचायत समिती सभापती शैलेश इंगोले, बाजार समिती सभापती अभिषेक ठाकरे, भाजपा शहराध्यक्ष विष्णू नामपल्लीवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रजय कडू, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय गोडे, शिवसेनेचे शहर अध्यक्ष मनोज ढगले, मनकासेचे जिल्हाध्यक्ष प्रा. घनश्याम दरणे, मदन जिड्डेवार, रिना घावडे, बाळासाहेब शिंदे, राम आईनवार, ज्योत्स्ना आचार्य यांचा सहभाग होता. दारूबंदीसाठी सकारात्मक असलेल्या संस्था व संघटनांनी टपालाद्वारे थेट जिल्हाधिकाऱ्यांना ठराव पाठवून या मोहिमेत सहभागी होण्याची विनंती महेश पवार यांनी केली. मंगळवारी राबविलेल्या मोहिमेसाठी भावना पाटील, कोमल जाचक, सुशांत भुरे, ललिता ठाकूर, प्रशांत उगले, सिंधु शिरपुरे, अंजली अडेकार, पुष्पा गजबे, साधना माडुरवार, अ‍ॅड. सादिक खान, समीर चौधरी, मोहिनी गोल्हर, रितेश सहारे, कैलास निकोडे, पंकज कोवे, शुभविता कुळसंगे, अजिंक्य मांडवगोडे, सुहासिनी माहुरे, मनीषा तुरके, लता चौधरी, ललिता राठोड, योगिता पवार, रत्नमाला गजघाटे, रेहाना शेख, फरजान शेख सत्तार, माया धुळे, ज्योती वाघाडे, ताई काकडे आदींनी पुढाकार घेतला. जिल्ह्यात दारूबंदी व्हावी यासाठी हाती घेण्यात आलेली मोहीम अधिक तीव्र करण्याचा पवित्रा ‘स्वामिनी’ अभियानातर्फे घेण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)