शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

वन्यप्राण्यांमुळे हानीच्या मोबदल्याचा अभ्यास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 21:35 IST

हिंस्त्र वन्यप्राण्यांमुळे शेतकरी व शेतमजुराचे मोठे नुकसान होत आहे. जंगल परिसरातील अनेकांच्या उपजीविकेवर याचा परिणाम झाला आहे. हे आर्थिक नुकसान निश्चित करून त्याचा मोबदला किती द्यायचा हे ठरविण्यासाठी वन विभागाने हे स्वतंत्र अभ्यास समिती गठित केली आहे.

ठळक मुद्दे१३ सदस्यीय स्वतंत्र समिती स्थापन : जिल्ह्यातील गावात जाऊन करणार नुकसानीचा अभ्यास

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हिंस्त्र वन्यप्राण्यांमुळे शेतकरी व शेतमजुराचे मोठे नुकसान होत आहे. जंगल परिसरातील अनेकांच्या उपजीविकेवर याचा परिणाम झाला आहे. हे आर्थिक नुकसान निश्चित करून त्याचा मोबदला किती द्यायचा हे ठरविण्यासाठी वन विभागाने हे स्वतंत्र अभ्यास समिती गठित केली आहे. या समितीत १३ सदस्य आहेत. विविध गावांमधून शेतकऱ्यांशी चर्चा करून समिती मोबदला देण्याचे निकष ठरविणार आहे.वाघ, बिबट, अस्वल या वन्यप्राण्यांचा शेतात किंवा शेतालगतच्या परिसरात वावर असल्याने शेतकरी, शेतमजूर शेताकडे फिरकू शकत नाहीत. परिणामी शेतातील कामे खोळंबतात. याचा उत्पादनावर परिणाम होतो. शेतमजुरांची दैनंदिन मजुरी बुडते. याचा अभ्यास करून आर्थिक मोबदला देण्याचे निकष ठरविण्यात येणार आहे. शिवाय नुकसानीची ओळख पटविण्याकरिता, नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि नुकसानभरपाई देण्याकरिता अटी व शर्थी निश्चित केल्या जाणार आहेत. वन्यप्राण्यांपासून झालेल्या पिकांच्या नुकसानीचे मूल्यांकन करण्याकरिता इतर काही राज्यांनीही निकष ठरविले आहे. तेथील विविध पद्धतींचा अभ्यास करून महाराष्टÑात गठण करण्यात आलेली समिती अहवाल तयार करणार आहे. समिती वन्यप्राण्यांच्या नुकसानीसंदर्भात अभ्यास करून स्पष्ट अहवाल तीन महिन्याच्या आत राज्य शासनाकडे सादर करणार आहे. समितीचे अध्यक्ष अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नागपूर हे आहेत. सदस्यांमध्ये विनोद तिवारी, तसनीम अहमद, संजीव गौड, आर.के. वानखडे, गजेंद्र नरवने, अ‍ॅड. फिर्दोस मिर्झा, सुहास तुळजापूरकर, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील मुग्धा चांदूरकर, इम्तियाज खैर्दी, नितेश भुतेकर, मोहन जाधव, रवीकिरण गोवेकर यांचा समावेश आहे.वन्यप्राण्यांच्या नुकसानीला विमा संरक्षणवन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होणे अथवा शेतातील पिकांचे नुकसान होणे यासाठी विमा संरक्षण योजना कार्यान्वित करता येऊ शकते का याचाही अभ्यास समिती करीत आहे. तसे झाल्यास हवामान विम्याच्या धर्तीवर शेतकऱ्यांंना आपल्या पिकांचा विमा उतरवून वन्यप्राण्यांनी पीकाचे नुकसान केल्यास नुकसानभरपाई विम्याच्या स्वरूपात मिळविता येणे शक्य होईल का याची पडताळणी सुरू आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती